दोन भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्तान परत पाठविणार?

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद-  घातपाती कृत्यांत सहभागी असल्याच्या आरोपांवरून भारतीय उच्चायुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांना पाकिस्तान देश सोडण्यास सांगणार असल्याचे वृत्त येथील स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

इस्लामाबाद-  घातपाती कृत्यांत सहभागी असल्याच्या आरोपांवरून भारतीय उच्चायुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांना पाकिस्तान देश सोडण्यास सांगणार असल्याचे वृत्त येथील स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

या दोन अधिकाऱ्यांची नावे आणि छायाचित्रे स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दाखविली जात आहेत. भारतीय उच्चायुक्तालयातील वाणिज्य अधिकारी राजेश अग्निहोत्री आणि माध्यम अधिकारी बलबीर सिंग यांना कदाचित परत पाठविले जाणार असल्याचे वृत्त जीओ टीव्हीने दिले आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे, की अग्निहोत्री यांचे थेट "रॉ'शी संबंध होते, तर सिंग हे "आयबी'साठी काम करीत होते. त्यांची खरी ओळख लपवून ते येथे काम करीत होते. सिंग हे पाकिस्तानात दहशतवाद्यांचे नेटवर्क चालवित होते. यापूर्वी परत पाठविण्यात आलेले अधिकारी सूरजितसिंगदेखील या नेटवर्कचाच भाग होते.''

या वृत्ताबाबत भारतीय उच्चायुक्तालयाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

Web Title: The two Indian officers go back to Pakistan?