दुसऱ्याच्या युद्धात भारतीयांचा विनाकारण बळी! रशियाच्या लष्करात भरती झालेल्या दोघांचा मृत्यू

Indians recruited by Russian: रशियातील सर्व भारतीय जे रशियन लष्करात आहेत, त्यांना भारतात परत पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे.
russian army
russian army

नवी दिल्ली- रशियाच्या लष्करामध्ये काम करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये दोन भारतीय रशियाच्या लष्करामध्ये जवान म्हणून काम करत होते. युद्धादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात सांगितलं की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. शिवाय, मॉस्कोमधील भारतीय राजदूताने तेथील प्रशासनाला आणि भारतातील रशियाच्या राजदूतांना याबाबत विचारणा करण्यात आली आहे. रशियातील सर्व भारतीय जे रशियन लष्करात आहेत, त्यांना भारतात परत पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे.

russian army
Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

रशियाच्या लष्कराने भरती केलेल्या दोन भारतीयांचा मृत्यू झालाय हे सांगताना आम्हाला खूप दु:ख होत आहे. मृतांच्या कुटुंबियांबाबत आम्ही संवेदना व्यक्त करतो. आम्ही मॉस्को राजदूताशी संपर्क केला असून भारतीयांचे पार्थिव लवकरात लवकर परत करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र खात्याने दिली आहे.

russian army
Russia-Ukraine War: गुगल ट्रान्सलेटने सहा भारतीयांना रशियन युद्धातून बाहेर पडण्यास कशी केली मदत? नेमकं काय घडलं?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले असून रशियामधील कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी अर्ज करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. रिपोर्टनुसार, अनेक भारतीयांना नोकरीचे आमिष देऊन रशियामध्ये नेण्यात आले आहे. त्याठिकाणी भारतीयांना रशियाच्या लष्करात भरती केले जात आहे. भारतीयांच्या हातात शस्त्र देऊन त्यांना युद्ध भूमीत पाठवलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताने यासंदर्भात रशियन सरकारशी बोलणी केली असून यापुढे कोणत्याही भारतीयांची भरती न करण्याची विनंती केली आहे. अशा प्रकारचे कृत्य आपल्या मैत्रीसाठी चांगले नाही असा देखील इशारा रशियाला भारताकडून देण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र खात्याने सांगितलं की, यासंदर्भात आम्ही मॉस्कोशी संपर्कात असून प्रत्येक गोष्टीची अपडेट घेतली जात आहे.

रशियामध्ये मोठ्या पगाराचे आमिष दाखवणारे रॅकेट चालवणाऱ्यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. देशातील विविध ठिकाणाहून अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com