दोघा भावांचा धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था
Thursday, 23 July 2020

इमारतीला आग लागल्यानंतर दोन मुलांनी खिडकीतून खाली उड्या मारल्या. सुदैवाने दोघेही बचावले असून, दोघांचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ग्रेनोबल (फ्रान्स): इमारतीला आग लागल्यानंतर दोन मुलांनी खिडकीतून खाली उड्या मारल्या. सुदैवाने दोघेही बचावले असून, दोघांचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अपहरणकर्त्यांशी भिडली आई; व्हिडिओ व्हायरल...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ग्रेनोबल शहरात मंगळवारी (ता. 21) ही घटना घडली. दोन मुलांना घरात ठेवल्यानंतर दरवाजाला कुलूप लाऊन आई-वडील बाजारात गेले होते. यावळी इमारतीला आग लागली. घर बंद असल्यामुळे मुलांना घराबाहेर पडता येत नव्हते. आगीचा भडका वाढत चालला होता. यामुळे 3 आणि 10 वर्षीय मुलांनी तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा निर्णय घेतला. प्रसंगावधान दाखवत आधी मोठ्या भावाने लहान भावाला बाहेर काढले, मग स्वत: बाहेर निघाला. त्यानंतर या दोघांनी खाली उडी मारली. इमारतीखाली थांबलेल्या नागरिकांनी त्यांना अलगद झेलत जीव वाचवला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two kids jump off from 40 foot to save life at france video viral

Tags
टॉपिकस
Topic Tags: