अफगाण बाॅर्डरवर दहशतवाद्यांचा गोळीबार; पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

Afghan border
Afghan borderesakal

इस्लामाबाद : अफगाणिस्तानची (Afghanistan) सत्ता तालिबान्यांनी (Taliban) ताब्यात घेतल्यानंतर, पाकिस्तानचा (Pakistan) 'माज' उतरलेला दिसत आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या सीमेपलीकडून खैबर पख्तूनख्वा प्रांतात जोरदार गोळीबार केला, ज्यात पाकिस्तानी लष्कराचे दोन जवान शहीद झाले. ही घटना पाकिस्तानच्या बाजौर जिल्ह्यात घडलीय. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे, तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

Summary

पाकिस्तानी लष्करानेही प्रत्युत्तरात दोन ते तीन दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे.

मात्र, पाकिस्तानी लष्करानेही प्रत्युत्तरात दोन ते तीन दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे. 'डॉन' या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया शाखेनं अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवाद्यांकडून पाकिस्तानविरोधी कारवायांसाठी वापर केल्याचा तीव्र निषेध केला. पाकिस्तान लष्करानं म्हटलं आहे, आम्हाला आशा आहे, की यापुढं अफगाणिस्तान भविष्यात अशा कारवायांना कधीच परवानगी देणार नाही.

Afghan border
काबूलमध्ये पाण्याची बाटली 3 हजाराला, तर राइस प्लेट 7500 रुपयात

आंतर-सेवा जनसंपर्कने (ISPR) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अफगाणिस्तानातून आतंकवाद्यांनी बाजौर जिल्ह्यातील एका लष्करी चौकीला लक्ष्य करत जोरदार गोळीबार केला. या गोळीबाराला पाकिस्तानी सैन्याच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिलं, ज्यात दोन ते तीन दहशतवादी ठार झाले तर तीन ते चार जखमी झाले आहेत. तर, गुरुवारी बामन सेक्टरमधील अफगाणिस्तानच्या सीमेपलीकडून एका चेक पोस्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पाकिस्तानी सैनिक ठार झाला आहे.

Afghan border
स्पेनसह जर्मनी, स्वीडनने काबुलमधील 'बचाव मोहीम' थांबवली

'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, तालिबाननं तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) मुद्द्यावर इम्रान सरकारलाही धारेवर धरलं. टीटीपी ही दहशतवादी संघटना पाकिस्तानची समस्या नाही, त्यामुळं ती पाकिस्ताननेच सोडवावी, असं स्पष्ट मत खुद्द तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी स्पष्ट केलंय. पाकिस्तानलाच टीटीपीला सामोरं जावं लागेल, असंही त्यांनी सांगितलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com