अमेरिकेत लँडिंगवेळी दोन विमानांमध्ये हवेत टक्कर; अनेकांच्या मृत्यूची भीती

अमेरिकेत लँडिंगवेळी दोन विमानांमध्ये हवेत टक्कर; अनेकांच्या मृत्यूची भीती

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात लँडिंगवेळी दोन विमानांची हवेत टक्कर होऊन अपघात झाला आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात गुरुवारी वॉटसनविले शहरात घडल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. ट्विन इंजिन असलेले विमान विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्नात असताना हा अपघात झाला आहे. अपघात झालेली विमाने दोन आणि तीन सीटरची होती. यामध्ये किती लोक होते, याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही तसेच किती जण जखमी किंवा मृत्युमुखी पडलेले याची ठोस आकडेवारी समोर आलेली नाही.

स्थानिक अधिकार्‍यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. त्यावेळी दोन्ही खासगी छोटी विमाने विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात होती. फेडरल एव्हिएशन एजन्सीच्या म्हणण्यानुसार यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड अपघाताची चौकशी करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com