esakal | इस्रायल-पॅलेस्टाइन वाद संपवण्याचा एकच मार्ग; बायडेन यांनी सुचवला पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

इस्रायल-पॅलेस्टाइन वादावर एकच मार्ग; बायडेन यांचा सल्ला

इस्रायल-पॅलेस्टाइन वादावर एकच मार्ग; बायडेन यांचा सल्ला

sakal_logo
By
सूरज यादव

वॉशिंग्टन - गेल्या अकरा दिवसापासून सुरु असलेला इस्रायल-हमास (Israel-Hamas) यांच्यातील संघर्ष अखेर युद्धबंदीने थांबला. अमेरिकेच्या दबावामुळे युद्धबंदीवर दोन्ही बाजूने एकमत झाल्याचंही म्हटलं जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी शुक्रवारी गाझाच्या पुननिर्मितीच्या प्रयत्नांसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाइन (Palestine) अशा दोन स्वतंत्र राज्यांची निर्मिती हेच या संघर्षावर एकमेव उत्तर आहे असंही बायडेन यांनी म्हटलं. बायडेन यांनी इस्रायलला जेरुसलेमच्या (Jeruslem) फ्लॅशपॉइंट शहरात सुरु असलेली सांप्रदायिक लढाई थांबवण्याचं आवाहन केलं आहे. बायडेन म्हणाले की, इस्रायलच्या सुरक्षेबद्दल असलेल्या माझ्या कटिबद्धतेत कोणताही बदल झालेला नाही. जोपर्यंत इस्रायलचं अस्तित्व स्वीकारलं जाणार नाही तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही. (two-state-solution-is-only-answer-on-isreale-palestine-conflict-says-joe-biden)

हेही वाचा: चीनची दादागिरी..म्हणतो, 'दलाई लामा आम्हीच निवडणार'

दोन राज्यांचा पर्याय हा इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने अनेक दशकांपासून आंतरराष्ट्रीय रणनितीचा भाग राहिला आहे. याअंतर्गत इस्रायल आणि एक स्वतंत्र पॅलेस्टाइन राज्य निर्माण करणं आणि त्यांची राजधानी जेरुसलेम स्थापन करणं हे या रणनितीमध्ये आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या नितीवर टीका करताना इस्रायल समर्थक असल्याचा आणि पॅलेस्टाइनकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला गेला. ट्रम्प यांचे सल्लागार आणि त्यांचे जावई जेरेड कुशनर यांनी तयार केलेल्या एका मध्य पूर्व शांती योजनेतही दोन राज्यांचा प्रस्ताव होता. मात्र त्यात अशा पॅलेस्टाइनच्या निर्मितीची कल्पना होती ज्यामध्ये मर्यादित स्वातंत्र्य होतं. इस्रायलचे काही अधिकार त्या राज्यावर राहणार होते.

हेही वाचा: केपी ओलींना धक्का; नेपाळमध्ये मध्यावधी निवडणुकांची घोषणा

ट्र्म्प यांच्या या प्रस्तावाला पॅलेस्टाइन नेत्यांनी फेटाळून लावलं होतं. बायडेन यांनी शुक्रवारी दोन स्वतंत्र राज्यांच्या नितीवर जोर दिला. ते म्हणाले की, इस्रायलच्या सुरक्षेसाठी माझी कटिबद्धता कायम आहे. कालावधी किंवा इतर कोणताही बदल झालेला नाही. मात्र काय बदल झाला हे मी तुम्हाला सांगतो, आपल्याला दोन राज्यांच्या पर्यायाची गरज आहे आणि हेच या संघर्षावर एकमेव उत्तर आहे.

loading image