दहशतवाद्यांच्या दोन गटांवर पाकमध्ये बंदी

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद - "तालिबान' आणि "अल कायदा' या दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या दहशतवाद्यांच्या दोन गटांवर पाकिस्तानने बंदी घातली आहे. पाकिस्तानात विविध ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांशी बंदी घालण्यात आलेल्या गटांचा संबंध असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

"तेहरिके तालिबान पाकिस्तान' या संघटनेशी संबंधित "जमात-उल-अहरार' आणि "लष्करे जांगवी' (एलईजे) या दहशतवादी गटांवर बंदी घालण्यात आल्याचे आज स्पष्ट करण्यात आले. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांशी बंदी घालण्यात आलेल्या संघटनांचा संबंध होता, असे सांगण्यात आले. मागील आठवड्यात बलुचिस्तानातील सुफी धर्मस्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही या संघटनांचा हात होता. या हल्ल्यात 50 जण मृत्युमुखी पडले होते.

या दोन्ही दहशतवादी गटांवर बंदी घालण्याचा निर्णय मागील काही दिवसांपूर्वीच घेण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिल्याचे "डॉन' वृत्तपत्राने म्हटले आहे. मागील काही काळात पाकिस्तानात अनेक मोठे दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. "जमात-उद-दवा' या दहशतवादी संघटनेचा 2007मध्ये हालचालींवर नजर ठेवण्यात येत असलेल्या संघटनांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे; तर "लष्करे तोयबा' आणि "जैशे महंमद' या संघटनांवर 2002 मध्येच बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Two terrorist groups banned in Pakistan