
आंदोलनाचे छायाचित्रण केल्याच्या कारणावरून बेलारूसमध्ये दूरचित्रवाणी वाहिनीच्या दोन महिला पत्रकारांना दोन वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. सरकारविरुद्ध बंडास चिथावणी मिळेल अशी परिस्थिती निर्माण केल्याचा तसेच राजकीय अस्थिरता निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मिंस्क (बेलारूस) - आंदोलनाचे छायाचित्रण केल्याच्या कारणावरून बेलारूसमध्ये दूरचित्रवाणी वाहिनीच्या दोन महिला पत्रकारांना दोन वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. सरकारविरुद्ध बंडास चिथावणी मिळेल अशी परिस्थिती निर्माण केल्याचा तसेच राजकीय अस्थिरता निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कॅटरीना आंद्रेयेवा आणि डॅरीया चुल्तसोवा अशी त्यांची नावे आहेत. पोलंडमध्ये मुख्यालय असलेल्या बेलसॅट टीव्ही या वाहिनीसाठी त्या काम करतात. कॅटरीना २७, तर डॅरीया २३ वर्षांची आहे. कायदेशीर परवानगी नसलेल्या आंदोलनाचे छायाचित्रण केल्याबद्दल त्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक झाली होती.
नोबेल विजेत्या मलाला युसुफझाईला 'त्या' दहशतवाद्याची पुन्हा धमकी; म्हणाला...
१४ व्या मजल्यावरून छायाचित्रण
चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅटरीना आणि डॅरीया १५ नोव्हेंबर रोजी मिंस्कमधील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून आंदोलनाचे छायाचित्रण करीत होत्या. त्यांच्यामुळे सुव्यवस्था धोक्यात आली. त्यातून १३ मार्गांवरील बस सेवा विस्कळित करण्यात आली, तसेच ट्रॉलीबस आणि ट्राम मार्गांवरील वाहतूकही रोखण्यात आली.
मशिदीत बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग घेताना स्फोट; 30 दहशतवादी ठार
बेलसॅट टीव्ही व्यवस्थापमातर्फे तर्फे या आरोपाचे खंडन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतुकीचा मार्ग पडताळला असता संबंधित चौकांमध्ये आमच्या पत्रकार छायाचित्रण करीत नव्हत्या, असे स्पष्ट करण्यात आले.
स्वतंत्र माध्यमांची नाकेबंदी
राजकीय टीकाकारांनी ही कारवाई म्हणजे स्वतंत्र माध्यमांची एकूणच नाकेबंदी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Edited By - Prashant Patil