esakal | मशिदीत बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग घेताना स्फोट; 30 दहशतवादी ठार
sakal

बोलून बातमी शोधा

afganistan blast masjid

एका मशिदीत दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्याचं ट्रेनिंग दिलं जात होतं. यावेळीच स्फोट झाला आणि 30 जण जागीच ठार झाले.

मशिदीत बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग घेताना स्फोट; 30 दहशतवादी ठार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काबुल - अफगाणिस्तानात बॉम्ब तयार करत असताना स्फोट झाला आहे. या घटनेत तालिबानचे 30 दहशतवादी ठार झाले. अफगाणिस्तानातील एका मशिदीत दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्याचं ट्रेनिंग दिलं जात होतं. यावेळीच स्फोट झाला आणि 30 जण जागीच ठार झाले. अफगाणिस्तानातील बाल्ख प्रांतात ही घटना घडली. अफगाणिस्तानच्या लष्कराने याची माहिती दिली आहे. 

लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तालिबानी दहशतवाद्यांचा एक ग्रुप दौलताबाद जिल्ह्यातील क्वाल्टा गावात बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेत होता. यावेळी अचानक बॉम्ब स्फोट झाला आणि 30 जण ठार झाले. यामध्ये 6 परदेशी दहशतवादीही होते. त्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी दहशतवादी एका मशिदीत एकत्र आले होते. यावेळी त्यांनी रस्त्यात पुरण्यात येणारे आईडी बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. 

हे वाचा - वन्यजीव व्यापारामुळे जैवविविधता धोक्यात

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान यांनी सांगितलं की, स्फोटाच्या ठिकाणी कोणीही जिवंत वाचलं नाही. हा सर्वात मोठी आणि अशा प्रकराची पहिलीच घटना आहे. याआधी अशा घटनेमध्ये जास्ती जास्त 10 दहशतवादी मारले गेले होते. दहशतवादी संघटना तालिबाननेसुद्धा याला दुजोरा दिला असला तरी दहशतवादी ठार झाल्याबद्दल काहीच माहिती दिली नाही.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बाल्ख प्रांतात गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तानातील सर्वात सुरक्षित असा भाग आहे. मात्र आता तालिबानी दहशतवाद्यांनी अमेरिकन सैनिक कमी झाल्यानं आणि नेत्यांमधील गोंधळाचा फायदा घेत याठिकाणी जम बसवला आहे. तालबानींकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण होणं कठीण दिसत आहे.