2 वर्षांच्या चिमुकल्याने असे वाचवले भावाचे प्राण

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

दोन चिमुकले भाऊ एका ड्रेसर टेबलवर चढण्याच्या प्रयत्न करीत असताना हा टेबल सरकून त्यांच्या अंगावर पडतो. एक भाऊ टेबलच्या खालून बाहेर निघतो, परंतु दुसरा टेबलखालीच अडकतो... आपला भाऊ अडकून पडल्यामुळे रडत न बसता दुसऱ्या जुळ्या भावाने त्याला वाचविण्यासाठी केलेली ही धडपड नक्की पाहा.

ओरेम (उटाह) : खेळता खेळता ओढवलेल्या संकटातून एका दोन वर्षांच्या चिमुकल्याने प्रयत्नांची पराकाष्टा करीत आपल्या जुळ्या भावाचा जीव वाचवला. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ जगभरात सोशल मीडियावर आश्चर्य आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

कॅमेरामध्ये कैद झालेला दोनच मिनिटांचा अमेरिकेतील ओरेम येथील हा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. मात्र, त्या चिमुकल्याने शक्कल लढवून भावाचे प्राण वाचविल्याचे पाहून बघणारेही सुटकेचा निश्वास टाकतात. या मुलांचे वडील रिकी शॉफ यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ते दोघेही सुखरूप असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

दोन चिमुकले भाऊ एका ड्रेसर टेबलवर चढण्याच्या प्रयत्न करीत असताना हा टेबल सरकून त्यांच्या अंगावर पडतो. एक भाऊ टेबलच्या खालून बाहेर निघतो, परंतु दुसरा टेबलखालीच अडकतो... आपला भाऊ अडकून पडल्यामुळे रडत न बसता दुसऱ्या जुळ्या भावाने त्याला वाचविण्यासाठी केलेली ही धडपड नक्की पाहा.

मला हा व्हिडिओ शेअर करताना थोडा संकोच वाटत आहे, परंतु याबद्दल जागृती करण्यासाठी हे आवश्यक आहे. या दोन्ही भावांमध्ये जो बंध आहे ते पाहून मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते. हे अविश्वनीय आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two year old miraculously saves twin brother (full video)

व्हिडीओ गॅलरी