‘यूएन’च्या युवा नेत्यांमध्ये उदित सिंघल या भारतातील युवकाचा समावेश 

पीटीआय
Saturday, 19 September 2020

जगासमोरील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या युवकांचही राष्ट्रसंघातर्फे घेतली जाणारी सर्वोच्च पातळीवरील दखल आहे. उदित याच्याबरोबर जगातील इतर १६ जणांचाही या यादीत समावेश आहे. 

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांनी शाश्‍वत विकास उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी तयार केलेल्या यादीत युवा नेत्यांच्या यादीत उदित सिंघल (वय १८) या भारतातील युवकाचा समावेश करण्यात आला आहे. जगासमोरील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या युवकांचही राष्ट्रसंघातर्फे घेतली जाणारी सर्वोच्च पातळीवरील दखल आहे. उदित याच्याबरोबर जगातील इतर १६ जणांचाही या यादीत समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उदितने दिल्लीतील काचेच्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा म्हणून ‘ग्लास टू सँड’ ही शून्य कचरा यंत्रणा आखली आहे. काचेच्या रिकाम्या बाटल्या जमिनीत पुरल्यास त्यांचे विघटन न होता त्या लाखो वर्षे तशाच राहतात. त्यामुळे अशा बाटल्या पुरण्याऐवजी त्यांचे बारीक तुकडे करून व्यापारी पातळी वापरता येणारी वाळू तयार करण्यासाठी त्यांचे बारीक तुकडे करावेत, यासाठी उदितने पुढाकार घेतला आहे. ‘शाश्‍वत विकासातील युवा नेता म्हणून मी बदल घडवून आणण्यासाठी कायम सक्रीय राहिल. सार्वजनिक शिस्त पाळून योग्य जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी मी लोकांना प्रोत्साहन देऊ शकेल,’ असा विश्‍वास उदितने व्यक्त केला. उदितने २०१८ पासून आतापर्यंत आठ हजारांहून अधिक काचेच्या बाटल्या जमिनीत पुरण्यापासून थांबवत त्यांच्यापासून ४८१५ किलो मूल्यवान वाळू तयार केली आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udit Singhal is one of the young leaders of the UN