LGBTQ Bill : या देशात 'गे' असणं झालं पाप; समलैंगिकांना तुरुंगात पाठवणारं विधेयक मंजूर

समलैंगिकतेबद्दल अनेक देशांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे.
LGBTQ
LGBTQesakal

Uganda Parliament LGBTQ Bill : समलैंगिकतेबद्दल अनेक देशांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. एखादा देश समलैंगिकतेला पाप मानत असेल आणि समाजाच्या विरोधात असेल, तर भारतासह असे अनेक देश आहेत जिथं समलिंगी लोक सामान्य जोडप्याप्रमाणं स्वातंत्र्यानं जीवन जगू शकतात.

ताजं प्रकरण पूर्व आफ्रिकेतील युगांडाचं आहे. येथील संसदेनं (Uganda Parliament) एक विधेयक मंजूर केलंय. या विधेयकानुसार, एखादी व्यक्ती समलैंगिक किंवा समलिंगी असल्याचं आढळून आल्यास त्याला गुन्हेगार मानलं जाणार आहे.

युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी (Uganda President Yoweri Museveni) यांनी या विधेयकाला कायदा बनवण्यास मान्यता दिल्यास अशा लोकांना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागू शकतो. युगांडा सरकारनं लागू केलेल्या कायद्यानुसार कुटुंब, समुदाय आणि मित्रांना समलैंगिक व्यक्तींची माहिती अधिकाऱ्यांना द्यावी लागते. युगांडामध्ये समलैंगिकता आधीच बेकायदेशीर मानली जाते.

LGBTQ
Politics : काँग्रेस पुन्हा मोठा प्रयोग करण्याच्या तयारीत; 'या' नेत्यावर सोपवणार अध्यक्षपदाची जबाबदारी!

हे विधेयक या महिन्याच्या सुरुवातीला सादर करण्यात आलं होतं, तर काल पूर्व समर्थनासह मंगळवारी ते संसदेत मंजूर करण्यात आलं. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडं पाठवलं जाणार आहे. त्यांनी या विधेयकाला संमती दिल्यास समलैंगिकांना गुन्हेगार ठरवणारा कायदा लागू होईल.

LGBTQ
Imran Khan : न्यायालयात साक्ष नोंदवताना माझी हत्‍या होईल; माजी पंतप्रधानानं व्‍यक्‍त केली भीती

समलैंगिक व्यक्ती मुलांचं संगोपन करण्यास पात्र नसल्याचं विधेयकात म्हटलंय. ते दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षाही भोगावी लागू शकते. एलजीबीटी समुदायानं (LGBT Community) या विधेयकाला विरोध केलाय. 2014 मध्ये युगांडाच्या एका कोर्टानं असाच कायदा रद्द केला होता. ज्यानं LGBT समुदायाविरुद्ध कठोर कायदे केले होते. तेव्हा असे कायदे संसदेतून मंजूर करून घेऊन लागू करावेत, असं न्यायालयानं म्हटलं होतं. जगातील जवळपास 30 आफ्रिकन देशांमध्ये समलैंगिक संबंधांवर बंदी असल्याचं सांगितले जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com