esakal | 305 दिवस कोरोना पॉझिटिव्ह, अंत्यसंस्काराची तयारीही झालेली, पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News- Both die due to corona; 29 new positives

एका ब्रिटिश व्यक्तीने सलग 305 दिवस कोरोना संक्रमित राहिल्यानंतर विषाणूवर मात करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. सर्वाधिक काळ कोरोनाशी लढा देत जिंवत राहण्याचे जगातील हे पहिले प्रकरण आहे.

305 दिवस कोरोना पॉझिटिव्ह, अंत्यसंस्काराची तयारी झालेली, पण...

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

लंडन- एका ब्रिटिश व्यक्तीने सलग 305 दिवस कोरोना संक्रमित राहिल्यानंतर विषाणूवर मात करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. सर्वाधिक काळ कोरोनाशी लढा देत जिंवत राहण्याचे जगातील हे पहिले प्रकरण आहे. 72 वर्षीय डेव स्मिथ यांनी कायम सकारात्मक विचार ठेवले आणि शेवटी त्यांनी या भयंकर विषाणूला हरवलं आहे. त्यांच्या या दीर्घ लढण्याचे अनेक जण कौतुक करत आहे. तसेच त्यांनी 305 दिवसानंतर कोरोनावर मात केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

स्मिथ यांनी यावर बोलताना सांगितलं की, 'दीर्घ संक्रमणादरम्यान मी प्रत्येकवेळी प्रार्थना करत होता, मला वाटायचं की पुढे काहीतरी वाईट होणार आहे, पण असं काही झालं नाही. मला वाटायचं की माझा जीव निघून जात आहे, पण अशा परिस्थितीतही मी निराश झालो नाही. मी सातत्याने प्रार्थना करत राहिलो. एकदा तर मला मर्यादेच्या बाहेर कफ झाला. सलग पाच तास खोकला थांबत नव्हता. माझ्यावर प्रचंड ताण आला होता.'

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

मी स्वत:च्या मनाची तयारी केली होती. मी माझ्या सर्व ओळखीच्या लोकांना भेटायला बोलावलं आणि त्यांचा अखेरचा निरोप घेतला. माझ्या अंत्यसंस्कारामध्ये कोण-कोण येईल याचीही मी यादी केली होती, असं स्मिथ यांनी सांगितलं. आजारादरम्यान स्मिथ यांचे वजन 60 किलोने कमी झाले, कमरेचा आकार 44 इंचावरुन 28 इंच झाला. पण, त्यांनी हार मानली नाही आणि आपले विचार कायम सकारात्मक ठेवले.

हेही वाचा: Live: भांडुपमध्ये भिंत कोसळून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

पत्नीने सोडली होती आशा

नातेवाईकांनी स्मिथ जिवंत राहतील याची आशा सोडून दिली होती. त्यांच्या पत्नी लिंडा म्हणाल्या की, 'आजारदरम्यान स्मिथ जिवंत राहणार नाहीत असं मला अनेकदा वाटलं. संपूर्ण एक वर्ष माझ्यासाठी नरकापेक्षा कमी नव्हते. माझ्याकडे कमी पर्याय उपलब्ध होते.' दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून जगावर कोरोना महामारीचे संकट आहे. कोट्यवधी लोकांना विषाणूचे संक्रमण झाले आहे, तसेच कोट्यवधी लोकांनी यावर मात केली आहे. सकारात्मक विचार आणि योग्य काळजीच्या आधारावर विषाणूवर मात केले जाऊ शकते हे सिद्ध होत आहे.

loading image