गुडबाय म्हणत रशियन सैनिकांना रोखण्यासाठी त्याने स्वत:ला बॉम्बने उडवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia Ukraine War

एका सैनिकाने रशियन सैन्य जवळ येत असताना वेळ नसल्यानं रिमोट कंट्रोलऐवजी स्वत:च स्फोट घडवला.

गुडबाय म्हणत रशियन सैनिकांना रोखण्यासाठी त्याने स्वत:ला बॉम्बने उडवलं

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाचे आता युद्धात रुपांतर झाले आहे. युक्रेनने (Ukraine) त्यांच्या नागरिकांना युद्धात शस्त्र हाती घेण्यासाठी आवाहन केलं आहे. दरम्यान, रशियाविरोधात अनेक देश एकत्र आले असून त्यांनी रशियाची आर्थिक नाकेबंदी सुरु केली आहे. जपानमधील रशियाची (Russia) संपत्ती गोठवण्यात आली असून निर्यात थांबवली आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया, (Australia) तैवान आणि इतर काही देशांकडून रशियाविरोधात आणखी निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

युक्रेनवर सुरु असलेल्या हल्ल्यात शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. यातच एका सैनिकाने रशियन सैन्य जवळ येत असताना वेळ नसल्यानं रिमोट कंट्रोलऐवजी स्वत:च स्फोट घडवला. सैनिकाने दैशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. युक्रेनमध्ये प्रवेश करण्यासाठी रशियाचे सैन्य वेगाने हेनिचेस्की पुलाच्या दिशेने येत होते. सैन्य इतके जवळ आले की तेथेच दबा धरून बसलेल्या व्हिताली याला लांब जाऊन पुलाखाली लावलेली स्फोटके रिमोट कंट्रोलने फोडण्यासाठी वेळच उरला नाही. तेव्हा त्याने स्वत: त्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणण्याचा निर्णय घेतला. ‘मी स्वत:च स्फोट करतो, गुडबाय,’ असा संदेश त्याने आपल्या तुकडीला पाठविला. त्याने स्फोट घडवून आणत देशासाठी प्राणत्याग केला.

हेही वाचा: 'रशियाला एकटं पाडा' युक्रेनचं उद्ध्वस्त इमारतीचा फोटो शेअर करत जगाला आवाहन

व्हिताली यांनी पूल उडवून देशासाठी बलिदान दिल्याची माहिती जनरल स्टाफ ऑफ आर्म्ड फोर्सेस यांनी फेसबुक वरून दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, आपण पूल उडवत असल्याचा मेसेज व्हिताली यांनी दिला. त्यानंतर स्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज झाला. स्फोटात व्हिताली यांनी वीरमरण प्राप्त झाले. त्यांनी बलिदान देत घडवून आणलेल्या स्फोटामुळे रशियाचं सैन्य रोखता आलं. पुलाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी त्यांनी खूप कष्ट करावे लागले असंही फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Web Title: Ukraine Army Soldier Vitaly Blow Himself To Stop Russian Tanks Russia War Updates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top