
गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संघर्षात रशियाकडून सातत्यानं युक्रेनवर हल्ले केले जातायत. आता रशियाला युक्रेननं मोठा दणका दिलाय. रविवारी ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून रशियाचे एअरबेस उद्ध्वस्त केले. या एअरबेसवर बॉम्ब फेकणाऱ्या जवळपास ४० विमानांना या ड्रोनने उडवलं. हा हल्ला म्हणजे रशियाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.