
नवी दिल्लीः रशियाकडून येणाऱ्या तेलामुळे अमेरिका आणि नाटो देशांकडून भारतावर टीका होत असताना, आता युक्रेननेही भारताकडून येणाऱ्या डिझेलवर बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे. युक्रेनमधील ऊर्जा सल्लागार कंपनी 'एनकोर'ने सोमवारी घोषणा केली की, १ ऑक्टोबर २०२५ पासून युक्रेन भारताकडून डिझेल खरेदी करण्यावर प्रतिबंध घालू शकतो.