Ukraine Russia Crisis : युक्रेन व रशियाच्या हल्ल्यांमध्ये वाढ

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात हल्ल्यांच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. रशियाने युक्रेनमधील वीज केंद्रांवर पुन्हा एकदा हल्ले सुरू केले.
russia ukrain war
russia ukrain warsakal
Updated on

किव्ह - रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात हल्ल्यांच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. रशियाने युक्रेनमधील वीज केंद्रांवर पुन्हा एकदा हल्ले सुरू केले असून, युक्रेननेही रशियाच्या तेल प्रकल्पांवर आज ड्रोन हल्ले केले. युद्धसीमेवरही चकमकी वाढल्या आहेत.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला दोन वर्षे उलटून गेली आहेत. मागील काही महिन्यांपासून सीमेवरील घडामोडी कमी होऊन केवळ ड्रोन हल्ल्यांवर भर दिला जात होता. आताही एक हजार किलोमीटर लांबीच्या युद्धसीमेवर सैन्याची संख्या फारशी वाढली नसली तरी चकमकी वाढल्या आहेत.

अद्यापही दोन्ही बाजूंचा भर सीमेपासून दूरवर असलेल्या लक्ष्यांवर हल्ले करण्याकडेच आहे. युक्रेनने मागील काही महिन्यांत मॉस्कोवरही ड्रोन हल्ले केले आहेत. हवाई सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने रशियाने हे सर्व हल्ले परतवून लावले असले तरी यामुळे युक्रेनची क्षमता वाढल्याचे सिद्ध झाले आहे.

युक्रेनमधील वीज केंद्रांवर वारंवार हल्ले करणाऱ्या रशियाने आज पुन्हा एकदा या वीजकेंद्रांना लक्ष्य केले. मागील तीन महिन्यांतील हा सातवा मोठा हल्ला होता. रशियाने नऊ क्षेपणास्त्रे आणि २७ शाहिन ड्रोनच्या साह्याने युक्रेनच्या मध्य आणि पूर्व भागावर हल्ले केले.

सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. दरम्यान, युक्रेननेही रशियातील दोन तेल गोदामांवर हल्ले केले. युक्रेनने दोन दिवसांपूर्वीही एका तेल प्रकल्पावर ड्रोन हल्ला केल्याने मोठी आग लागली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.