रशिया युद्धभूमीवरील शस्त्रांसाठी भारताद्वारे पाश्चात्य घटक मिळवतो : UK Report | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia Ukraine War

रशिया युद्धभूमीवरील शस्त्रांसाठी भारताद्वारे पाश्चात्य घटक मिळवतो : UK Report

लंडन : पाश्चिमात्य देशांनी युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियावर निर्बंध लादले आहेत. मात्र, रशिया युद्धभूमीवर (Ukraine Russia War) वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांसाठी निर्बंध असलेले पाश्चिमात्य निर्मिती घटक बेकायदेशीररित्या मिळवत आहे. त्याला भारतातील कंपन्या गुप्तपणे मदत करत असल्याचा दावा रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट ( RUSI ) या ब्रिटिश संरक्षण आणि सुरक्षा थिंक टँकच्या अहवालात करण्यात आला आहे.

हेही वाचा: Russia - Ukraine War; रशिया आणि युक्रेन युध्द आता संपण्याच्या मार्गावर आहे का?

"ऑपरेशन झेड: द डेथ थ्रोज ऑफ अॅन इम्पीरियल डिल्यूजन" असे या अहवालाचे शीर्षक असून लँड वॉरफेअरचे वरिष्ठ रिसर्च फेलो निक रेनॉल्ड्स यांनी हा अहवाल तयार केला आहे. यामध्ये रशियन सैन्याद्वारे वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे तपशीलवार वर्णन केले आहे. युक्रेनमधील युद्धभूमीवर सापडलेल्या शस्त्रांमध्ये निर्बंध असलेले पाश्चिमात्य बनावटीचे घटक आढळून आले आहेत, असं या अहवालात म्हटलं आहे.

रशियन शस्त्रांमध्ये अनेक घटक हे दुसऱ्यांदा वापरलेले आहेत. रशियाने तिसऱ्या देशांमार्फत या वस्तू मिळविण्यासाठी यंत्रणा स्थापन केली आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशातून भारतासारख्या देशांमध्ये होणारी निर्यात थांबविण्यात यावी, असं या अहवालामध्ये म्हटलं आहे. काही रशियन लष्करी उपकरणांमध्ये दुहेरी वापराच्या वस्तू आहेत. त्यामुळे त्या नियंत्रित नाहीत. युकेसह पाश्चात्य देशांमधून त्या मिळविल्या जातात आणि तिसऱ्या देशांद्वारे रशियाला पुरविल्या जातात, असंही यामध्ये म्हटलं आहे.

रशियन अध्यक्षांनी मार्च महिन्यात एक समिती स्थापन केली. त्याद्वारे देशात कोणकोणते उत्पादन घेतले जाऊ शकते आणि आपल्या मित्र देशांकडून काय मिळवले जाऊ शकते याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार झेक प्रजासत्ताक, सर्बिया, आर्मेनिया, कझाकस्तान, तुर्की, भारत आणि चीनसह जगभरातील असंख्य कंपन्या आहेत, ज्या रशियाची कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी जोखमी पत्करण्याची शक्यता आहे. या देशांना होणारा पुरवठा मर्यादीत करणे गरजेचे आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.

युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी भारताला भेट दिल्यानंतर हा अहवाल समोर आला आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये नवीन तंत्रज्ञान शेअर करण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर आता अहवाल समोर आल्याने युकेने सावध पावले उचलली आहेत. यूकेचा आंतरराष्ट्रीय व्यापार विभाग आता रशियाविरुद्ध पुढील निर्बंध लादण्यासाठी सहकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. त्यामुळे आता पाश्चिमात्य मालाची खरेदी करणे कठीण होईल.

Web Title: Ukraine Russia War Uk Report Claim Russia Laundering Western Component For Weapon Through India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Russia Ukraine Crisis
go to top