"रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका"; झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर

युक्रेनला सध्या रशियासारख्या बलाढ्य सैन्याशी लढण्यासाठी बळ आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्षांनी हे आवाहन केलं आहे.
Ukraine President
Ukraine President
Updated on

कीव : रशियाविरोधात लढण्यास (Ukraine Russia War) तयार असल्यास युक्रेनमधील कैद्यांची (Ukraine prisoners) तुरुंगातून सुटका करण्यात येईल, अशी थेट ऑफरच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी कैद्यांना दिली आहे. रॉयटर्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Ukraine Volodymyr Zelensky says Ukraine will release prisoners if willing to join fight against Russia)

युक्रेनच्या तुरुंगात असलेल्या ज्या कैद्यांना लष्करी कारवायांचा अनुभव आहे, असे कैदी रशियाविरोधात लढण्यास इच्छुक असल्यास त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल, असं झेलेन्स्की यांनी आपल्या निवदेनात म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी रशियाच्या सैनिकांनीही आवाहन केलं की, "आपला जीव वाचवा आणि युक्रेनमधून माघारी फिरा"

Ukraine President
'लिव्ह इन'बाबत रुढीवादी समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज - हायकोर्ट

दरम्यान, या लढाईत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियन अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर राहण्याचा आदेश दिला आहे. यामुळं पूर्व आणि पश्चिम जगात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे सर्वसामान्य लोकही रशियन सैनिकांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वीच रशियन सैनिकांशी लढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मैदानात उतरण्याचं आवाहन राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की यांनी केलं होतं. यानंतर युक्रेनच्या नागरिकांनीही हातात हत्यारं घेतली असून रशियन सैनिकांशी दोन हात करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com