Ukraine War : खारकीवमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navin Shekharappa1

Ukraine : खारकीवमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

कीव : युक्रेनमधील खारकीव शहरात (Ukraine Kharkiv City) रशियानं केलेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. परराष्ट्र मंत्रालयानं (MEA) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नवीन शेखरप्पा (वय २१) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे. (Ukraine War Indian student killed in attack in Kharkiv Ukraine)

परराष्ट्र मंत्रालयाचे अरिंदम बागची म्हणाले, "आम्हाला सांगायला अतिशय वाईट वाटतंय की सकाळी खारकीव शहरात झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. परराष्ट्र सचिव रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांना फोन केला असून खारकीवसह इतर डेंजर झोनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप व्यवस्था करावी"

नवीन शेखरप्पा (वय २१) हा कर्नाटकातील हावेरी येथील रहिवासी आहे. युक्रेनमधील खारकीव इथं झालेल्या गोळीबारात या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. खारकीव इथं हे विद्यार्थी पश्चिमेकडे जाण्यासाठी निघाले होते. रेल्वेस्थानकाकडे जात असताना खारकीवसह आजूबाजूच्या शहरांमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरु आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले आणि गोळीबार केले जात आहेत. या ठिकाणी आत्तापर्यंत अनेक नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे.

युक्रेनमध्ये सध्या अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत अनेक विमानांद्वारे भारतात सुखरुप परत आणण्यात आलं आहे.

टॅग्स :global news