Mahesh Manjrekar: कोर्टाचा दिलासा, कारवाई न करण्याचे आदेश|Mahesh Manjrekar high Court Relief | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh manjrekar

Mahesh Manjrekar: कोर्टाचा दिलासा, कारवाई न करण्याचे आदेश

Mahesh Manjrekar: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे त्यांच्या वरण भात लोन्चा कोण नाय कोंचा (Entertainment News) या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्या चित्रपटातील प्रसंग, संवाद आणि भडक चित्रिकरण यामुळे तो चित्रपट वादास कारणीभूत ठरला होता. त्यामुळे त्याच्यावर महिला आयोगासह काही महिला संघटनांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर (Marathi Entertainment) आज कोर्टानं त्यांना दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी होईपर्यत कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना कोर्टानं दिले आहेत. वरण भात लोन्चा अन कोन नाय कोंचावरुन वादाला सुरुवात झाली होती.

आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची (Marathi Movie) ओळख आहे. ते गेल्या काही दिवसांपासुन चर्चेत आले आहे. त्यांचा वरणभात लोंचा कोन नाय कोंचा हा चित्रपट काही (Entertainment News) दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याच्या ट्रेलरवरुन प्रेक्षकांनी मांजरेकरांवर टीका करण्यात आली होती. अश्लील संवाद, चित्रिकरण यामुळे महिला आयोगानं देखील याची दखल घेतली होती. यासगळ्या प्रकरणात आता मांजरेकर यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्कोच्या सेक्शन 292, 34 तसेच आयटी सेक्शन 67 आणि 67 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुनावणी घेणारं नियमित खंडपीठ सध्या कार्यरत नसल्यानं यावर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली. ज्यात याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यापासून मुंबई पोलिसांना रोखण्यात यावं अशी मागणी मांजरेकर यांच्यावतीनं करण्यात आली. ज्याला राज्य सरकारकडनं विरोध करण्यात आला.