Ukraine Russia crisis : युक्रेनच्या महिला खासदाराने उचलली बंदूक; फोटो होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार किरा रुडिक

युक्रेनच्या महिला खासदाराने उचलली बंदूक; फोटो होतोय व्हायरल

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. एकीकडे रशियन सैन्य हळूहळू पुढे सरकत युक्रेनवर ताबा घेत आहे, तर दुसरीकडे युक्रेन पराभव स्वीकाराला तयार नाही. शेवटपर्यंत लढणार असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. युक्रेनच्या खासदार किरा रुडिक यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला (Ukraines female MP picks up a gun) आहे. ‘युक्रेनमधील प्रत्येक स्त्री-पुरुष रशियन अत्याचारी लोकांसमोर शस्त्र उचलण्यास तयार आहे’ असे त्यांनी लिहिले आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धाने आता निर्णायक वळण घेतले आहे. एकीकडे राजधानी कीवमध्ये रशियन सैन्य हळूहळू पुढे सरकत आहे आणि दुसरीकडे युक्रेन सरकार शरणागती पत्करायला तयार नाही. अमेरिका आणि पाश्चात्य देश थेट लढाईत उतरले नसून युक्रेनला शस्त्रे देऊन मदत करीत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, रशियन सैनिकांविरुद्धच्या लढाईत युक्रेनचे तरुण समोर आले आहेत.

ट्विटर अकाऊंटवर छायाचित्र (social media) पोस्ट करीत किरा रुडिक यांनी लिहिले की, युक्रेनमधील प्रत्येक स्त्री-पुरुष शस्त्र उचलण्यास आणि आक्रमक रशियन सैन्याविरुद्ध लढण्यास तयार आहे. रुडिकचा रायफल असलेला फोटो २५ फेब्रुवारीला पोस्ट केल्यानंतर ट्विटरवर व्हायरल झाला आहे. आम्ही ज्यावर विश्वास ठेवतो त्यासाठी लढायला तयार आहोत, इतरांकडून काहीतरी जिंकण्यासाठी आणि बळकावण्यासाठी नाही तर आमचे स्वातंत्र्य, आमचे लोक, आमच्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

Web Title: Ukraines Female Mp Picks Up A Gun Photo Viral Ready For War Against Russia Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Social MediaRussiaUkraine
go to top