
ब्रिटनच्या पंतप्रधानांना त्यांच्या भूमिकेबद्दल खडसावून प्रश्न विचारताना शेवटी मात्र त्या महिला पत्रकाराला अश्रू रोखता आले नाहीत.
'युद्धाच्या झळा युक्रेन सोसतंय, तुम्ही...' ब्रिटन PM समोर महिला पत्रकाराला अश्रू अनावर
लंडन - रशियाकडून सातत्यानं युक्रेनवर हल्ले होत आहेत. हवाई हल्ल्यात युक्रेनची (Ukraine) जिवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या हल्ल्याने व्यथित झालेल्या युक्रेनच्या महिला पत्रकाराला ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्यासमोर अश्रू अनावर झाले. युक्रेनची पत्रकार डारिया हिने बोरिस जॉन्सन यांना युक्रेनवर नो फ्लाय झोनसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. रशियाकडून खार्किव्ह शहरावर हल्ले केले जात आहेत. अशा परिस्थितीत नाटोकडून लष्करी मदतही केली जात नसल्याचं तिने म्हटलं आहे.
युक्रेनच्या लोकांकडून सुरक्षेसाठी पाश्चिमात्य देशांकडे विचारणा केली जात असल्याचं पत्रकार डारिया यांनी मंगळवारी वारसॉ इथं जॉन्सन यांच्या पत्रकार परिषदेवेळी म्हटलं. पत्रकार परिषद सुरु असतानाच महिला पत्रकार जॉन्सन यांच्यावर भडकलीसुद्धा. तिने म्हटलं की, पंतप्रधान तुम्ही किव्हला येत नाही, तुम्ही न येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला भीती वाटते. नाटो सुरक्षेसाठी तयार नाही, नाटोसुद्धा तिसऱ्या महायुद्धाला घाबरून आहे. खरंतर ते आधीच सुरु झालंय. युक्रेनचे नागरिक त्याच्या झळा सहन करत असल्याची भावना तिने व्यक्त केली.
हेही वाचा: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतून रशियाला हाकला; ब्रिटनची मागणी
बोरिस जॉन्सन यांनी नो फ्लाय झोनच्या मागणीबाबत युके असमर्थ असल्याचं त्यांनी प्रामाणिकपणे बोलून दाखवलं. तसंच त्यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, आम्ही करू शकतो किंवा आम्ही याबाबत विचार केला ते हे नाही. तसंच याचे परिणाम गंभीर आणि हाताबाहेरचे असतील. नो फ्लाय झोनला विरोध करणारे जॉन्सन हे एकटेच नाहीत. तर अमेरिका सोडल्यास इतर अनेक देशांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
Web Title: Ukrainian Journalist Broke Down When Ask Question To Uk Pm Boris Johnson
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..