Sat, March 25, 2023

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतून रशियाला हाकला; ब्रिटनची मागणी
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतून रशियाला हाकला; ब्रिटनची मागणी
Published on : 1 March 2022, 1:29 pm
लंडन : युक्रेनवरील आक्रमणानंतर (Ukraine War) रशियाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) पाच स्थायी सदस्यांपैकी एक म्हणून काढून टाकण्यास ब्रिटन सरकार तयार आहे, असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या प्रवक्त्यानं मंगळवारी स्पष्ट केलं. यासाठी संयुक्त राष्ट्रांशी आम्हाला स्पष्टपणे चर्चा करावी लागेल, असं नाव न सांगण्याच्या अटीवर या प्रवक्त्यानं पत्रकारांना सांगितलं. (UK says evicting Russia from UN Security Council among all options on table)
जॉन्सन यांच्या प्रवक्त्यानं म्हटलं, "आम्हाला रशियाला राजकीकदृष्ट्या एकटं पडल्याचं पाहायचं आहे आणि आमची ही इच्छा साध्य करण्यासाठी आम्ही सर्व पर्यायांचा विचार करू"
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन हे पाच देश स्थायी सदस्य आहेत.