
रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आलाय.
VIDEO : रशियन सैनिकाशी भिडली युक्रेनची महिला
रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यामध्ये युक्रेनची एक महिला (Ukraine Women) शस्त्रधारी रशियन सैनिकाशी (Russian Soldiers) लढताना दिसतेय. रशियन सैनिकानं महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेनं रशियन सैनिकाला दिलेल्या उत्तरानंतर तिचं खूप कौतुक होतंय.
गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन (Russia And Ukraine War) यांच्यात वाद चालू होता व या वादाचा परिणाम आता युद्धामध्ये झालेला पाहायला मिळत आहे. सध्या दोन्ही देशांत तणावाची स्थिती निर्माण झालीय. या युद्धादरम्यान रस्त्याच्या मधोमध एक स्त्री सशस्त्र रशियन सैनिकाशी भिडताना दिसतेय. रशियन सैनिक तिला शांत करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, ती महिला काही ऐकायला तयार नाहीय. ती महिला सैनिकांना उद्देशून बोलतेय, तुम्ही आमची जमीन ताब्यात घेतली. आम्हाला उद्धवस्त केलं. तुम्ही फॅसिस्ट आहात! आमच्या मातृभूमीवर बंदुकीनं गोळीबार केलात, यातून तुम्हाला काय साध्य झालं? असा सवाल करत त्या महिलेनं रशियन सैनिकाला सूर्यफुलाच्या बिया खिशात ठेवण्यास सांगितल्या आणि तुमच्या मातीतून फक्त सूर्यफूलच उगवतील, असं सांगून ती महिला तिथून निघून गेली. हा व्हिडिओ पाहून महिलेच्या धाडसाचं कौतुक होतंय.
हेही वाचा: युक्रेनवरील हल्ला अन्यायकारक, संपूर्ण जग पाठिशी : शेन वॉर्न
युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी म्हटलंय की, तीन दिवसांच्या युद्धात त्यांच्या 137 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापैकी 10 लष्करी अधिकारी आहेत. युक्रेनच्या सैन्यानं दावा केलाय की, त्यांनी 1000 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केलंय. तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हंटलं आहे की, त्यांनी युक्रेनमधील 211 लष्करी तळ नष्ट केली आहेत. मात्र, युक्रेन म्हणतंय, 'त्यांनी 80 रशियन टॅंक, 516 वाहनं, 7 हेलिकॉप्टर, 10 विमानं आणि 20 क्रूझ क्षेपणास्त्रं नष्ट केली आहेत.' दरम्यान, जगभरातील देश या युद्धाला विरोध करत आहेत.
Web Title: Ukrainian Woman Confronts Russian Soldier You Are Fascists Viral Video Russia Ukraine War
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..