ब्रिटनमधलं बर्मिंगहम शहर दिवाळखोर म्हणून घोषित; सिटी कौन्सिलने दिलं स्पष्टीकरण...

ब्रिटनमधलं बर्मिंगहम शहर दिवाळखोर म्हणून घोषित; सिटी कौन्सिलने दिलं स्पष्टीकरण...

नवी दिल्लीः एकेकाळी जगावर राज्य केलेल्या ब्रिटिश साम्राज्याला आता घरघर लागली आहे. मागच्या वर्षीपासून ब्रिटन आर्थिक संकटात आहे. आता ब्रिटनमधलं दुसरं एक शहर बर्मिंगहम दिवाळखोरीत निघालं आहे. शहराचा कारभार बघणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बजेटच्या तुटवड्यामुळे दिवोळखोरी घोषित केली. त्यामुळे शहरात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत.

बर्मिंगहम सिटी कौन्सिलची जबाबदारी विरोधी लेबर पार्टीकडे आहे. त्यांच्याकडे शंभरहून अधिक नगरसेवक आहेत. बर्मिंगहम स्थानिक प्रशासनाने कलम १४४ची नोटीस काढून तळागाळातल्या लोकांसाठी सेवा पुरविण्याविषयी भूमिका मांडली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येणार आहेत.

ब्रिटनमधलं बर्मिंगहम शहर दिवाळखोर म्हणून घोषित; सिटी कौन्सिलने दिलं स्पष्टीकरण...
उदयनिधी यांच्या सनातनबाबतच्या विधानावरून भाजप आक्रमक; वडेट्टीवार म्हणाले, मोदींना...

बर्मिंगहम सिटी कौन्सिलने सांगितलं की, आम्ही आर्थिक संकटात आहोत. समान वेतन दायित्वापोटी ६५० दशलक्ष ते ७६० दशलक्ष मिलियन पाऊंड खर्च करावे लागतात. त्यासाठीच्या उत्पन्नाचे संसाधनं नाहीत, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

याशिवाय कौन्सिलने सांगितलं की, सध्या सुरु असलेल्या खर्चांवर स्थानिक परिषद नियंत्रण आणेल आणि आर्थिक घडी बसवण्यासाठी कलम १५१ आमलात आणलं जाईल. गरीब लोक आणि वैधानिक सेवांच्या सुरक्षेसाठी नवीन खर्च बंद करण्यात येणार आहेत.

ब्रिटनमधलं बर्मिंगहम शहर दिवाळखोर म्हणून घोषित; सिटी कौन्सिलने दिलं स्पष्टीकरण...
कार्यकर्त्यांना १० वर्षांपासून वाटतं, मी मुख्यमंत्री व्हावं, त्यात...; पंकजा मुंडे यांचे विधान

बर्मिंगहम कव्हर करणाऱ्या वेस्ट मिडलँड्सचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी सांगितलं की, हा निर्णय अत्यंत त्रासदायक आहे. नेमकं घडलं काय याचा तपास करण्याची गरज आहे. मागच्या काही दिवसांपासून स्थानिक अधिकाऱ्यांना कपातीचा सामना करावा लागला आहे. भलेही सरकारकडून मिळणाऱ्या निधीमध्ये वाढ झाली असेल परंतु सेवा पुरवणं हीदेखील जबाबदारी आहे.

ब्रिटनमध्ये मागच्या वर्षीपासून आर्थिक संकट कोसळलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी सरकारने आर्थिक मंदी जाहीर केली होती. आता बर्मिंगहम शहराने दिवाळखोरी जाहीर केल्याने सरकार या शहराला कसं सावरणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com