लस वितरणासाठी ‘युनिसेफ’चा पुढाकार

unisef
unisef

न्यूयॉर्क - कोरोना विषाणूविरोधातील लस तयार झाल्यावर जगातील सर्व देशांना ती वेळेवर मिळावी यासाठी या संभाव्य लसींची खरेदी आणि वितरण करण्यात पुढाकार घेणार असल्याचे ‘युनिसेफ’ या संस्थेने जाहीर केले आहे. अशाप्रकारची ही जगातील सर्वांत मोठी आणि वेगवान मोहीम असेल, असेही सूत्रांनी सांगितले. 

युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ) ही लस खरेदी करणारी जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. ही संस्था दरवर्षी नियमित उपचारांसाठी विविध लसींचे दोन अब्ज डोस खरेदी करते आणि जवळपास शंभर देशांमध्ये या लसींचा वापर होतो. जगातील अनेक संस्था लसनिर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहेत. अनेक देशांनी या संस्थांबरोबर करारही केले आहेत. मात्र, गरीब देशांतील नागरिकांना लस वेळेवर मिळावी, यासाठी ‘युनिसेफ’ प्रयत्नशील आहे. ही संस्था ‘पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या सहकार्याने लस खरेदी आणि वितरणात पुढाकार घेणार आहे. जगभरातील १७० हून अधिक देशांचा समावेश असलेली ही प्रक्रिया जगातील सर्वांत मोठी ठरण्याचा अंदाज आहे. या संस्थांचे मिळणार सहकार्य

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जागतिक आरोग्य संघटना, गॅव्ही लस आघाडी, ‘सेपी’, ‘पाहो’, जागतिक बँक, बिल अँड मेलिंडा गेट्‌स फौंडेशन, पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. जवळपास २८ लस उत्पादकांनी त्यांच्या लसीबाबतचा अहवाल आणि उत्पादनाचे नियोजन जाहीर केले आहे. पुढील एक-दोन वर्षांत लसींचे उत्पादन करण्यासही काही कंपन्या तयार आहेत. मात्र, यासाठी लागणारी गुंतवणूक ही लसींचे अंतिम टप्प्यातील प्रयोग, त्यांची यशस्वीतता आणि संबंधित कंपन्यांनी केलेले करार यावर अवलंबून असल्याचा इशारा उत्पादकांनी दिला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लस वितरणाची योजना 
संस्थांकडून लस खरेदी करून ती प्रस्थापित यंत्रणेद्वारे वितरित करणार 
यासाठी विविध संस्था, देश आणि श्रीमंत व्यक्तींकडून मदत अपेक्षित 
लसींचे वितरण ९२ गरीब देशांमध्ये करणार 
प्रक्रियेत १७० हून अधिक देशांचा समावेश 
‘कोव्हॅक्स फॅसिलिटी’च्या माध्यमातून उपक्रम राबविणार

आम्ही नवीन आव्हान स्वीकारण्यास सज्ज आहोत. कोरोनाविरोधातील लसीचा जगभरात पुरवठा करण्यासाठी आणि हे संकट दूर करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. आम्ही दरवर्षी शंभरहून अधिक देशांच्यावतीने दोन अब्ज लसी विकत घेतो. आमच्यावर अनेक देशांचा विश्‍वास असल्यानेच आम्हाला लसींचा पुरवठा करण्याचा प्रचंड अनुभव मिळाला आहे.  
- युनिसेफ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com