esakal | संयुक्त राष्ट्र वर्षा अखेरपर्यंत करणार 40 टक्के लोकसंख्येचे लसीकरण IUN
sakal

बोलून बातमी शोधा

एंतोनियो गुतारेस

संयुक्त राष्ट्र वर्षा अखेरपर्यंत करणार 40 टक्के लोकसंख्येचे लसीकरण

sakal_logo
By
राहुल शेळके

संयुक्त राष्ट्र (पीटीआई) : संयुक्त राष्ट्रचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी गुरुवारी जगभरात सुरु असलेल्या लसीकरणातील असमानता दूर करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या वर्षाअखेर पर्यंत सर्व देशांतील 40% लोकसंख्येचे लसीकरण करणे आणि 2022 च्या मध्यापर्यंत 70% लोकसंख्येचे लसीकरण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सप्टेंबर पर्यंत प्रत्येक देशातील दहा टक्के लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष ठरवले होते परंतु सप्टेंबरच्या अखेर पर्यंत 56 देशांमध्ये ते लक्ष्य गाठले गेले नव्हते. या 56 देशांमध्ये सर्वाधिक देश हे आफ्रिका आणि मध्य पुर्वेकडील देश आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देशक टेट्रोस एडनॉम घेब्रेयसस आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटानियो गुतारेस यांनी धोरणामुळे मृत्युमुखी पडलेल्या लाखो लोकांबद्दल दुःख व्यक्त केले आणि आर्थिक मंदी बद्दलही चिंता व्यक्त केली.

गुतारेस म्हणाले की जागतिक आरोग्य संघटनेद्वारे तयार केलेली ही सर्वात मोठी आणि विस्तृत योजना आहे याच्या माध्यमातून यावर्षीच्या अखेर पर्यंत सर्व देशांचे 40% लसीकरण केले जाईल आणि 2022 पर्यंत 70% लोकांचे लसीकरण केले जाईल असा जागतिक आरोग्य संघटनेचा उद्देश आहे.

loading image
go to top