विमानातून बाहेर काढलेल्या प्रवाशाला नुकसानभरपाई

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

युनायटेड एअरलाईन्समधील विमान कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी एका विमान प्रवाशाला विमानाबाहेर काढले होते. या प्रकरणी संबंधित प्रवाशासोबत युनायटेड एअरलाईन्सने मैत्रीपूर्ण तडजोड केली असून नुकसानभरपाई म्हणून काही रक्‍कमही अदा केली आहे.

शिकागो : युनायटेड एअरलाईन्समधील विमान कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी एका विमान प्रवाशाला विमानाबाहेर काढले होते. या प्रकरणी संबंधित प्रवाशासोबत युनायटेड एअरलाईन्सने मैत्रीपूर्ण तडजोड केली असून नुकसानभरपाई म्हणून काही रक्‍कमही अदा केली आहे.

शिकागो येथील विमानतळावरून डेव्हिड डाओ (वय 69) नावाच्या प्रवाशाला 9 एप्रिल रोजी युनायटेड एअरलाईन्सच्या विमानातून बाहेर फेकण्यात आले होते. डाओच्या वकिलाच्या म्हणण्याप्रमाणे या घटनेत डाओच्या नाकाला मार लागला असून त्याचे दातही पडले होते. या प्रकरणामुळे मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी युनायटेड एअरलाईन्सने डाओ यांच्यासोबत मैत्रीपूर्ण तडजोड केली आहे. इतर कोणालाही दोष न देता युनायटेड एअरलाईन्सने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत डाओ यांच्याशी तडजोड केली आहे. मात्र या प्रकरणी किती रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे, याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.

अतिरिक्त आरक्षण झाल्याने एखाद्या प्रवाशाला जर विमान प्रवास करता आला तर नाही अशा वेळी युनायटेड एअरलाईन्स 10 हजार डॉलर्सपर्यंतची नुकसान भरपाई देते. त्यासंदर्भातील धोरणात बदल केल्यासाठी आमच्यासाठी प्रवासी केंद्रस्थानी असल्याची माहिती युनायटेड एअरलाईन्सच्या अधिकाऱ्याने दिली.

Web Title: United reaches settlement with passenger dragged off plane

टॅग्स