
अमेरिकेत कोरोनामुळे एका दिवसातील सर्वाधिक ३, ७४४ मृत्यूंची नोंद झाली, अशी माहिती जॉन हाफकिन्स विद्यापीठाने गुरूवारी दिली. अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा विक्रम सलग दुसऱ्या दिवशी मोडला गेला. मंगळवारी या साथीमुळे ३, ७२५ जणांचा मृत्यू झाला होता.
वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोनामुळे एका दिवसातील सर्वाधिक ३, ७४४ मृत्यूंची नोंद झाली, अशी माहिती जॉन हाफकिन्स विद्यापीठाने गुरूवारी दिली. अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा विक्रम सलग दुसऱ्या दिवशी मोडला गेला. मंगळवारी या साथीमुळे ३, ७२५ जणांचा मृत्यू झाला होता.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्याचप्रमाणे, गेल्या २४ तासांत अमेरिकेत आणखी २ लाख २९ हजार ४२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे, कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा आता २० कोटींच्या घरात गेला आहे. त्याचप्रमाणे, जवळपास साडेतीन लाख जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
Look Back 2020: जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकाही भारतीयाला नाही स्थान
अमेरिकेतील साथ नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून लशीचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत, कोरोनावरील १२ कोटींहून अधिक लशीचे केंद्राकडून वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, जवळपास ३० लाख जणांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लवकरच लशीचा दुसरा डोसही देण्यात येईल. कोरोनाच्या जागतिक साथीपुढे अमेरिकेसारख्या महासत्तेने गुडघे टेकल्याचे चित्र आहे.
Edited By - Prashant Patil