विद्यार्थ्यांना दिलासा, आता फ्रान्समध्येही चालणार UPI, Rupay कार्ड

upi and rupay card to be accepted in france from now an mou signed today between lycra network and npci
upi and rupay card to be accepted in france from now an mou signed today between lycra network and npci

UPI in France : सध्या डिजिटल व्यवहारांची मोठी क्रेझ आहे. डिजीटल व्यवहारांचे प्रमाण मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान आता फक्त देशात तसेच परदेशातही डिजिटल व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पण इथे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता फ्रान्ससारख्या देशात आता भारतीय विद्यार्थी किंवा प्रवास करणाऱ्यांना UPI आणि Rupay कार्ड वापरता येणार आहेत. फ्रान्स मध्ये विद्यार्थी आणि प्रवासी लवकरच यूपीआय आणि Rupay कार्ड वापरण्यास सक्षम असतील. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनलने फ्रान्सच्या लाइक्रा नेटवर्कसोबत (Lycra Network) सामंजस्य करार केला आहे.

(upi and rupay card to be accepted in france from now an mou signed today between lycra network and npci)

केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फ्रान्स आणि भारत यांच्यातील या सामंजस्य कराराची घोषणा केली. त्यांनी घोषणा करताना सांगितले की फ्रान्समध्ये जेथे Lyrca नेटवर्कचे टर्मिनल किंवा मशीन आहे, तेथे भारतीय UPI आणि Rupay कार्डने पेंमेट करू शकतील.

upi and rupay card to be accepted in france from now an mou signed today between lycra network and npci
MLC Election 2022 : राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी, दरेकरांचा आरोप

विद्यार्थी आणि प्रवाशांना दिलासा

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या सुविधेमुळे भारतीय विद्यार्थी आणि फ्रान्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना मोठी मदत होणार आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून पेमेंट करणे सोपे होईल. महत्वाचे म्हणजे भारतात दर महिन्याला तब्बल 5.5 अब्ज UPI व्यवहार केले जातात, त्यामुळे या सेवेचा फायदा होईल अशा वापरकर्त्यांची संख्या खूप जास्त आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांमध्ये UPI आधीच अस्तित्वात आहे. भारतीय UPI आधीच UAE, सिंगापूर आणि भूतानमध्ये वापरले जाते. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की फ्रान्सनंतर नेपाळमध्ये एनपीसीआय इंटरनॅशनल राबवण्याची योजना आहे.

upi and rupay card to be accepted in france from now an mou signed today between lycra network and npci
पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा खोतांना टोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com