

UPS Aircraft Crash in America Plane Bursts Into Flames During Takeoff Kills Four
Esakal
UPS Aircraft Crash in America: अमेरिकेतली लुइसविले मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच एक युपीएस कार्गो विमान कोसळल्याची घटना घडलीय. विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागून भडका उडाला. यात चौघांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. विमान दुर्घटनेनंतर हवाई उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. परिसरातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. अधिकाऱ्यांनी सांगितले की, युपीएस विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळलं. हे मालवाहू विमान लुइसविलेहून होनोलूलूला जात होतं.