esakal | चीनने कोरोना विषाणूवरील संशोधन चोरले; अमेरिकेचा गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber_Crime_15.jpg

अमेरिकेने चीनवर सायबर चोरीचा गंभीर आरोप केला आहे. दोन चिनी नागरिकांच्या एजेंसीने संरक्षण कंत्राटदार, कोविड-१९ संशोधन आणि शेकडो लोकांना लक्ष्य केल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने केला आहे

चीनने कोरोना विषाणूवरील संशोधन चोरले; अमेरिकेचा गंभीर आरोप

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- अमेरिकेने चीनवर सायबर चोरीचा गंभीर आरोप केला आहे. दोन चिनी नागरिकांच्या एजेंसीने संरक्षण कंत्राटदार, कोविड-१९ संशोधन आणि शेकडो लोकांना लक्ष्य केल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने केला आहे. ली झीयाओयू आणि डोंग जिअझी यांनी शस्त्र डिसाईन, ओषध माहिती, सॉफ्टवेअर सोर्स कोड आणि चीनला विरोध करणाऱ्या व्यक्तींची माहिती चोरी केली आहे. ते चीन सरकारचे कंत्राटदार म्हणून काम करतात, असा आरोप न्याय विभागाने केला आहे. 

सचिन पायलट ३५ कोटी प्रकरणी आक्रमक; पाठवली कायदेशीर नोटीस
चीन सायबर गुन्हेगारांना आपल्या देशात मुक्तद्वार देत आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे चीन आता रशिया, इराण, उत्तर कोरिया यांच्या गटात जाऊन बसला आहे. हे देश नेहमीच सायबर गुन्हेगारांसाठी नंदनवन ठरले आहेत, अशी टीका राष्ट्रीय सुरक्षेचे अॅटर्नी जनरल सहाय्यक जॉन डेमेर्स म्हणाले आहेत.

अमेरिकेने यामध्ये कोणत्याही कंपनीचा उल्लेख केला नाही. मात्र, जगभरातील आणि अमेरिकेतील शेकडो लोकांची सायबर चोरी झाल्याचं म्हटलं आहे. २०१५ साली अमेरिकी न्यूक्लीअर क्षेत्रासंबंधी हँनफोर्ड साईटवर सायबर हल्ला झाला होता. तेव्हापासून आम्ही या प्रकरणात तपास करत होतो, असं अॅटर्नी विलियम हायलोप यांनी सांगितलं. ली आणि डोंग हे सर्वाधिक सक्रिय गट आहेत, ज्यांचा आम्ही शोध घेत होतो, असं एफबीआयचे विशेष एजंट रेमंड डुडा म्हणाले.

अमेरिकी नागरिक चीनला न्यायालयात खेचणार
ली आणि डोंग हे चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाचे (एमएसएस) कंत्राटदार आहेत. एमएसएस अमेरिकेतील सेंट्रल इंटेलिजेन्स एजेन्सीसारखं काम करते. एमएसएसला संवेदनशील ज्ञान गोळा करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये घुसण्याची माहिती हॅकर्सनी पुरवली. यात हाँगकाँगमधील आंदोलन, दलाई लामाचे कार्यालय यांचा समावेश असल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे.

२७ जानेवारीपासून जेव्हा कोरोनाचा उद्रेक सुरु झाला, तेव्हा या हॅकर्सनी कोविड-१९ संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही चोरलं आहे का याबाबत अस्पष्टता आहे, पण हा प्रकार फार गंभीर आहे, असं अमेरिकेने म्हटलं आहे. चीनचा हा प्रयत्न जगातील सर्व सरकारांसाठी धोका आहे. चिनी सरकारने या सायबर हॅकर्सना फार पूर्वीपासून सहाय्य केलं आहे. या हॅकर्संनी चीनला मोठी संवेदनशील माहिती पुरवली असल्याचं सायबर अधिकारी बेन रिड यांनी सांगितलं आहे.