चाबहार पोर्टजवळ अमेरिकेचे हल्ले, लढाऊ विमानातून बॉम्ब फेकल्यानं विध्वंस; भारतासाठी हे महत्त्वाचं बंदर

America Attack on Chabhar Port अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनी, खार्ग बेटानंतर चाबहार पोर्टकडे त्यांचा मोर्चा वळवलाय. भारतासाठी महत्त्वाचं असलेल्या चाबहार पोर्टवर अमेरिकेकडून बॉम्ब हल्ले केले जात आहेत.
US Targets Chabahar Port After Strait of Hormuz Tension

US Targets Chabahar Port After Strait of Hormuz Tension

Esakal

Updated on

US Airstrikes Reported Near Chabahar Port आखाती युद्धाचा भडका दिवसेंदिवस आणखी मोठा होताना दिसत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराणनेसुद्धा जशास तसे प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर इराणकडून शत्रू देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आलीय. त्यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेकडून खार्ग बेटांवर हल्ला करत इराणची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच आता अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनी, खार्ग बेटानंतर चाबहार पोर्टकडे त्यांचा मोर्चा वळवलाय. भारतासाठी महत्त्वाचं असलेल्या चाबहार पोर्टवर अमेरिकेकडून बॉम्ब हल्ले केले जात आहेत. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी पोर्टजवळ ट्रेड झोनमध्ये लष्करी तळांवर बॉम्ब हल्ला करण्यात आलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com