esakal | चिनी हवाई हद्दीत अमेरिकेने पाठवली बॉम्ब फेकणारी विमाने; दिला सज्जड दम
sakal

बोलून बातमी शोधा

fighter aircraft

अमेरिकेत सत्तेच्या हस्तांतरणावरुन अद्याप तिथला माहोल गरम असला तरीही चीनबाबतची अमेरिकन परराष्ट्र नीती स्पष्ट आहे.

चिनी हवाई हद्दीत अमेरिकेने पाठवली बॉम्ब फेकणारी विमाने; दिला सज्जड दम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेत भलेही राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबतची रणधुमाळी अद्याप शमलेली नाहीये. सत्तेच्या हस्तांतरणावरुन अद्याप तिथला माहोल गरम असला तरीही चीनबाबतची अमेरिकन परराष्ट्र नीती स्पष्ट आहे. फ्लाईट मॉनिटर एअरक्राफ्ट स्पॉट्सच्या अनुसार, अमेरिकेने अलिकडेच चीनच्या Air defense identification zone (ADIZ) मध्ये म्हणजेच चीनच्या हवाई हद्दीमध्ये दोन मोठ्या पल्ल्याची बॉम्ब फेकू शकणारी विमाने पाठवली होती. 

हेही वाचा - सीमाप्रश्न : अजित पवारांचं वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबलं
अमेरिकेचे हे पाऊल म्हणजे एकप्रकारे चीनला दिलेले खुले आव्हानच आहे. जर चीनने आपल्या कुरापती बंद केल्या नाही तर अमेरिकेचे वायुदल चीनमध्ये घुसून त्याला नेस्तनाबूत करण्याची क्षमता ठेवून आहे. अमेरिकीची विमाने जेंव्हा चीनच्या अवकाशात घुटमळत होती तेंव्हा चीन स्वत: एका नौसेनेच्या अभ्यासात मग्न होता. फ्लाईट मॉनिटर एअरक्राफ्ट स्पॉट्सने मंगळवारी सकाळी सांगितलं की दोन अमेरिकन FB-1 बॉम्ब फेकू शकणारी विमाने चीनच्या हवाई  हद्दीत (ADIZ) मध्ये गेली होती. त्यानंतर काही काळानंतरच ती परत आलीत. B1-B मध्ये कोणत्याही बॉम्ब फेकू शकणाऱ्या विमानाच्या तुलनेत अधिक कार्यक्षमता आहे तसेच अमेरिकेने याआधीसुद्धा याचा वापर केला आहे. या प्रकारच्या विमानांना हेरगिरी करण्यासाठी वापरले जात नाही. हेरगिरीसाठी अशी विमाने तैनात केली जात नाहीत. त्यामुळे, असं म्हटलं जात आहे की, अमेरिकेने चीनला एकप्रकारे इशारा देण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. एअरक्राफ्ट स्पॉट्सच्या ट्विटमध्ये म्हटलं गेलंय की अमेरिकेच्या या विमानांचे शेवटचे ठिकाण हे पूर्वेकडील चीनच्या समुद्रामध्ये चीनच्या हवाई हद्दीत होती.  

हेही वाचा - इंदिरा गांधी जन्मदिन : त्यांचे पाच असे निर्णय ज्यांनी भारताचे चित्र पालटले
अमेरिका पूर्व आशियामध्ये शांती आणि संतुलन राखण्यसाठी सध्या मोहिमेवर आहे. त्यांनी पुन्हा एकदा चीनच्या हवाई हद्दीत आपली विमाने पाठवून हे स्पष्ट केलंय की, देशांतर्गत सत्तेच्या अस्थिरतेमुळे त्यांच्या परराष्ट्र नीतीवर कसलाही प्रभाव पडलेला नाहीये. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हारल्यामुळे असं मानलं जात आहे की बायडन यांचा चीनच्या प्रती असलेली भुमिका काहीशी थंड झाली आहे. मात्र, याबाबतची स्पष्टता ते सत्तेत आल्यानंतरच येईल. 

loading image