esakal | इंदिरा गांधी जन्मदिन : त्यांचे पाच असे निर्णय ज्यांनी भारताचे चित्र पालटले
sakal

बोलून बातमी शोधा

indira gandhi

जाणून घेऊयात त्यांच्या अशा निर्णयांबाबत ज्यामुळे भारताच्या व्यवस्थांमध्ये आमुलाग्र बदल झाले.

इंदिरा गांधी जन्मदिन : त्यांचे पाच असे निर्णय ज्यांनी भारताचे चित्र पालटले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची आज जयंती. आयरन लेडी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या इंदिरा गांधी यांची भारतीय राजकारणात एक वेगळी ओळख राहिली आहे. इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे जगातील ताकदवान नेत्यांमध्ये त्यांचं नाव आजही गणलं जातं. ज्या काळात चूल आणि मूल हेच बाईचं कार्यक्षेत्र होतं, त्याकाळात एक महिला पंतप्रधान भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचत होती. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी जे निर्णय घेतले ते कधीच विसरता न येणारे आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि साहसी असे निर्णय घेतले. त्यांच्या अनेक निर्णयांमुळे देशाला आर्थिक आघाड्यांवर मजबूत बनवले. जाणून घेऊयात त्यांच्या अशा निर्णयांबाबत ज्यामुळे भारताच्या व्यवस्थांमध्ये आमुलाग्र बदल झाले.

हेही वाचा - सीमाप्रश्न भडकवणारी वक्तव्ये नकोत; अजित पवारांच्या वक्तव्याचा कर्नाटकचे CM येडीयुरप्पांकडून निषेध​
बँकांचे राष्ट्रीयकरण
इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात बँकांचा राष्ट्रीयकरणाचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. या बँकावर जास्तकरुन मोठ्या औद्योगिक घराण्यांचे वर्चस्व होतं. इंदिरा गांधी यांचं म्हणणं होतं की बँकाचे राष्ट्रीयकरण झालं तर ते योग्य राहिल. कारण त्यामुळे देशभरात बँकांना क्रेडिट दिलं जाईल. त्यावेळी मोरारजी देसाई अर्थमंत्री होते. त्यांनी या प्रस्तावाला नाकारलं होतं. 19 जुलै 1969 रोजी एक अध्यादेश आणला आणि 14 बँकांची असलेली स्वायत्तता नष्ट करुन त्याचे राष्ट्रीयकरण केले. त्यावेळी या बँकाकडे देशातील 70 टक्के भांडवल होतं. बँकाचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर 40 टक्के भांडवल प्रायमरी सेक्टरमध्ये गुंतवणूकीसाठी ठेवलं गेलं. देशभरात ग्रामीण भागात बँकांच्या शाखा उघडल्या गेल्या. 1969 मध्ये 8261 शाखा होत्या. 2000 पर्यंत 65521 शाखा उघडल्या गेल्या. 1980 मध्ये आणखी सहा बँकांचे राष्ट्रीयकरण केलं गेलं. 


राजा-महाराजांचे भत्ते बंद
स्वातंत्र्यापूर्वी देशात जवळपास 500 छोटी-मोठी संस्थाने होती. प्रत्येक संस्थानाला भारतात सामिल करुन घेण्यासाठी भारत सरकारद्वारे दरवर्षी राजभत्ता दिला जायचा. हा करार सरदार पटेल यांच्याद्वारे केला गेला होता. इंदिरा गांधी यांनी हा राजभत्ता रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1971 मध्ये संविधानमध्ये दुरुस्ती करुन ही तरतुद रद्द केली. 

हेही वाचा - अखेर ट्विटरचा माफीनामा; चूक सुधारण्यासाठी मागितला वेळ​
बांग्लादेशचा उदय
भारताच्या फाळणीनंतर बंगालपासून फूटून जाऊन पूर्व पाकिस्तान बनला होता. तेथील नागरिकांना अधिकार नव्हते. पूर्व पाकिस्तानमधील जनता पाकिस्तानच्या सैन्याच्या शासनामध्ये दबावाखाली होती. शेख मुजीबुर रहमान हे पूर्व पाकिस्तानच्या स्वायत्ततेसाठी संघर्ष करत होते. पूर्व पाकिस्तानमध्ये यावरुन गृहयुद्ध सुरु झालं होतं. 
यामुळे भारतातील आसाम राज्यामध्ये जवळपास 10 लाख बांगला शरणार्थी लोक पोहोचले होते. ज्यामुळे देशात आर्थिक संकट निर्माण झालं. भारताला बांग्लादेशियांच्या विनंतीनंतर या समस्येमध्ये हस्तक्षेप करावा लागला. ज्यामुळे 1971 चे युद्ध सुरु झाले. या युद्धात जवळपास 93,000 पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी बनवलं गेलं. मोठ्या राजकीय अस्थिरतेनंतर एका नव्या राष्ट्राचा उदय झाला.

 
भारताची पहिली अणुचाचणी
18 मे 1974 रोजी भारताने जगामध्ये आपली अण्वस्त्र शक्ती आजमावली. भारताने आपली पहिली अणुचाचणी पोखरणमध्ये केली. ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी या परिक्षणाला स्मायलिंग बुद्धा असं नाव दिलं होतं. हे परिक्षण राजस्थानजवळील जैसलमेरपासून जवळपास 140 किमी दूर लोहारकी गावाजवळील मलका गावांत केलं गेलं. भारताच्या या अणूचाचणीमुळे जगातील मोठमोठे देश चिंतेत पडले होते. 

हेही वाचा - नेताजींच्या जयंती दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; ममता दीदींचे PM मोदींना पत्र

ऑपरेशन ब्लू स्टार
या ऑपरेशनला सर्वांत भीतीदायक मानलं जातं. भिंद्रनवाले आणि त्यांचे साथी स्वतंत्र 'खलिस्तान'ती मागणी करत होते. ते स्वर्ण मंदिरात लपले होते. या दहशतवाद्यांना मारण्यासाठी इंदिरा गांधी यांनी 'ऑपरेशन ब्लू स्टार' करण्याचा निर्णय घेतला. या ऑपरेशनमुळे स्वतंत्र खलिस्तानची मागणी धुडकावून लावण्यात आली. 

loading image
go to top