अमेरिकी सैन्यामध्ये धार्मिकतेला मोकळीक

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

मेरिकच्या लष्करात सेवेत असणाऱ्या शीख सैनिकांनी वारंवार पाठपुरावा केल्याचाच हा परिणाम असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे काही विशिष्ट प्रसंग सोडल्यास शीख सैनिकांना त्यांच्या धर्माचे पूर्णपणे पालन करता येणार आहे

वॉशिंग्टन - धर्माचा भाग म्हणून दाढी वाढविणाऱ्या, पगडी घालणाऱ्या आणि हिजाब घालणाऱ्यांस सामावून घेण्याचा निर्णय अमेरिकी लष्कराने घेतला आहे. या नव्या नियमामुळे शीख नागरिकांसह अमेरिकेतील सर्व अल्पसंख्यांकांना अमेरिकेच्या सैन्यामध्ये प्रवेश घेता येणे शक्‍य झाले आहे.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने हे नवे नियम प्रसिद्ध केले आहेत. या नियमांना मंजुरी मिळताच सैन्यातील सर्व पदांसाठी ते लागू होतील, यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. अमेरिकच्या लष्करात सेवेत असणाऱ्या शीख सैनिकांनी वारंवार पाठपुरावा केल्याचाच हा परिणाम असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे काही विशिष्ट प्रसंग सोडल्यास शीख सैनिकांना त्यांच्या धर्माचे पूर्णपणे पालन करता येणार आहे.

अमेरिकेतील शीख नागरिकांनी या देशावर नेहमीच प्रेम केले असून, त्यांचा अमेरिकेला अभिमान आहे. आजचा निर्णय अमेरिकेच्या लष्करासाठी महत्त्वाचा आहे, असे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. येथील शीख समुदायाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
 

Web Title: US Army Allows Turbans, Beards, Hijabs In Military

टॅग्स