
इराण आणि इस्रायलमधील युद्धात आता अमेरिकेनेही उडी आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुस्थळांवर हा हल्ला पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार अशा इशारा इराणने सरकारी वाहिनीवरुन अमेरिकेला दिला आहे.