US Immigration Rule
ESakal
ग्लोबल
US Immigration Rule: अमेरिकेचा अजून एक मोठा धक्का! परदेशी लोकांसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम बदलले, आता प्रवेशासाठी 'ही' गोष्ट आवश्यक
US Immigration Rule Change 2025: अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या प्रत्येक बिगर-नागरिकाचे छायाचित्र काढले जाईल. यामध्ये ग्रीन कार्ड धारक, व्हिसावर असलेले परदेशी आणि स्थलांतरितांचा समावेश आहे.
अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक बिगर-अमेरिकन नागरिकाचे आता छायाचित्रण केले जाईल. हे पाऊल डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणाचा एक भाग आहे. ज्याचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे आणि बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालणे आहे. यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन एजन्सीने शुक्रवारी फेडरल रजिस्टरमध्ये हा प्रस्ताव प्रसिद्ध केला.

