Tahawwur Rana : तहव्वूर राणाची रिट याचिका फेटाळली; भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

तहव्वूर राणा हा मूळ पाकिस्तानी वंशाचा असून तो कॅनडाचा नागरिक
us court denies writ of habeas corpus filed by mumbai terror attacks accused tahawwur rana
us court denies writ of habeas corpus filed by mumbai terror attacks accused tahawwur ranaSakal

वॉशिंग्टन : २६/११ चा आरोपी तहव्वूर राणा याने त्याच्या प्रत्यार्पणाविरोधात केलेली हेबियस कॉर्पसची याचिका येथील न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे त्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठीही प्रक्रिया पूर्ण करण्याचा येथील परराष्ट्र मंत्रालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

तहव्वूर राणा हा मूळ पाकिस्तानी वंशाचा असून तो कॅनडाचा नागरिक आहे. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या बाँब हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा भारताचा आरोप असून याप्रकरणी खटला चालविण्यासाठी त्याला ताब्यात देण्याची भारताची मागणी आहे. भारताच्या प्रत्यार्पण याचिकेवर अनेक महिने सुनावणी झाल्यानंतर मे महिन्यामध्ये अमेरिकेतील न्यायालयाने राणाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली होती.

न्यायालयाच्या या आदेशाला राणा याने रिट याचिका दाखल करत आव्हान दिले होते. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. प्रत्यार्पणाच्या अर्जावर परराष्ट्र मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. न्यायालयाने परवानगी दिली असल्याने परराष्ट्र मंत्रालयाकडून लवकरच राणाचा ताबा भारताकडे दिला जाण्याची शक्यता आहे. राणा सध्या लॉस एंजेलिस पोलिसांच्या ताब्यात आहे.

राणाची पुन्हा याचिका

राणा याने रिट याचिका फेटाळण्याच्या न्यायालयाच्या आदेशालाही आव्हान दिले आहे. तसेच, या आव्हान याचिकेवर विभागीय न्यायालयात सुनावणी पूर्ण होईपर्यंत प्रत्यार्पणाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्याने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com