
अमेरिकेतील एका न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीला देण्यात येणाऱ्या २.६ अब्ज डॉलर्सच्या संशोधन निधीत कपात करण्यात आली होती. याविरोधात हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीने न्यायालयात धाव घेतलेली. न्यायालयाने हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीच्या बाजूने निकाल देत निधीत कपात करणं चूक होती असं स्पष्ट केलं. हॉर्वर्डने सरकारच्या काही मागण्या मान्य करण्यास नकार दिला यामुळे निधीत कपात करणं चुकीचं आहे असं न्यायालयाने म्हटलं.