

अमेरिकेतील सरकारी आणि गुप्तचर यंत्रणांवरील सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. एफबीआय (FBI) आणि कृषी विभागानंतर आता अमेरिकेची प्रमुख गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) च्या एका प्रणालीमध्ये हॅकर्सनी घुसखोरी केली आहे. भारताच्या 'रॉ' (RAW) या गुप्तचर संस्थेच्या समकक्ष मानल्या जाणाऱ्या CIA वरील या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा फटका ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स (ODNI) या विभागालाही बसला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा