esakal | US Election: अमेरिकेच्या निवडणुकीतही नवरात्री; जो बायडेन, कमला हॅरिस यांनी दिल्या शुभेच्छा
sakal

बोलून बातमी शोधा

jo biden kamla harris.jpg

डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतही भारतीय मतदारांची महत्त्वाची भूमिका आहे.

US Election: अमेरिकेच्या निवडणुकीतही नवरात्री; जो बायडेन, कमला हॅरिस यांनी दिल्या शुभेच्छा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन- अमेरिकेत पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. तेथील निवडणूक प्रचारात दिवसेंदिवस रंगत येत आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी कोणीच कसर सोडताना दिसत नाही. यावेळी डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतही भारतीय मतदारांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळेच कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन हे अमेरिका आणि जगभरातील हिंदूंना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यास विसरले नाहीत. 

बायडेन यांनी टि्वट करुन म्हटले की, हिंदू धर्माचा सण नवरात्रीनिमित्त मी आणि जिल बायडेन (जो बायडन यांच्या पत्नी) अमेरिका आणि जगभरातील हिंदूंना शुभेच्छा देत आहे. वाईटावर देवाने विजय मिळवावा, प्रत्येकासाठी ही नवी सुरुवात आणि नवीन संधी मिळो. 

तर कमला हॅरिस यांनीही टि्वट करुन हिंदू-अमेरिकन मित्रांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाले की, हा उत्सव आपल्या सर्वांच्या उत्कर्षासाठी आणि न्याय्य व निष्पक्ष अमेरिकेच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी असावा.

दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदासाठी सुरु असलेल्या प्रचारादरम्यान जो बायडेन आणि रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील डिबेट कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एक टाऊन हॉल इव्हेंट आयोजित करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या तुलनेत सर्वाधिक लोकांनी बायडेन यांचा कार्यक्रम पाहणे पसंत केले. 

हेही वाचा- US Election "निवडणुकीत पराभव झाल्यास मला देश सोडावा लागेल"