

US diesel prices
esakal
US diesel prices record: भारतात एकीकडे महागाईचा भडका उडालेला असतानाच दुसरीकडे अमेरिकेलाही महागाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. अमेरिकेत डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. डिझेलच्या किंमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या वापरातील वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत.