जगासाठी पोलिसाची भूमिका अमेरिकेला नको : ट्रम्प

पीटीआय
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

वॉशिंग्टन : "अमेरिका जगासाठी पोलिसाची भूमिका निभावू शकत नाही. अन्य देशांनाही त्यांच्या जबाबदारी जाणीव असावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे समर्थन केले. 

वॉशिंग्टन : "अमेरिका जगासाठी पोलिसाची भूमिका निभावू शकत नाही. अन्य देशांनाही त्यांच्या जबाबदारी जाणीव असावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे समर्थन केले. 

ट्रम्प यांनी बुधवारी अचानक इराकला भेट दिली. तेथील अमेरिकी सैन्याची पाहणी केली. पत्नी मेलेनिया हिच्यासह ट्रम्प नाताळच्या रात्री गुप्तपणे वॉशिंग्टनहून निघाले व काल इराकला पोचले. तेथे त्यांनी अमेरिकेच्या सैन्याला भेटून नाताळच्या शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे सैनिक, वरिष्ठ लष्करी अधिकारी हे इराकमध्ये बजावत असलेली सेवा, त्याग व यशाबद्दल त्यांचे आभार ट्रम्प यांनी मानले. पश्‍चिम बगदादमधील हवाई तळावर 100 गणवेशधारी सैनिकांपुढे भाषण देताना ट्रम्प यांना सीरियातून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्याच्या स्वतःच्या निर्णयाचे समर्थन केले. 

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी "अमेरिका जगासाठी कायम पोलिसाच्या भूमिकेत राहू शकणार नाही,' असे स्पष्ट केले. "इसिस' व सीरियाविरोधातील कारवायांसाठी अमेरिका इराकचा प्रादेशिक तळ म्हणून वापर करेल, असेही ते म्हणाले. जगाची सर्व जबाबदारी आमच्यावर म्हणजे अमेरिकेवर टाकणे हे योग्य नाही. आम्ही इतर देशांमधून विशेषतः तुर्कस्तानमधूनही सैन्याला परत बोलावणार आहोत. युद्धजन्य देशांमधून "इसिस'चे उच्चाटन झाल्यानंतर सौदी अरेबिया तेथे विकास कामांसाठी गुंतवणूक करेल. 

सीरियातून माघारी येण्यासाठी सैन्याच्या जनरलना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यांना अजून मुदत देण्यात येणार नाही. तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तैयप एर्देगॉन यांच्याशी समाधानकारक बोलणी झाली असून, अमेरिकी फौजांना परत पाठविण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. अन्य देशही त्याला होकार देतील, कारण आम्ही त्यांच्या प्रदेशात आहोत. 

"... तर परिणाम वाईट होतील' 

जर अमेरिकेला दुसऱ्या दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ आली, तर माझे प्रशासन त्याला कठोरपणे उत्तर देईल,' असा इशारा ट्रम्प यांनी या वेळी दिला. जर असे काही झाले तर पूर्वी कधी भोगले नाही, असे परिणाम त्याला भोगावे लागतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US does not want police role for the world says Donald Trump