Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

140 Million Barrels to Hit Market as Brent Crude Touches $120: इराण-अमेरिका तणावात तेलाच्या किमतींमध्ये वाढ; १४० दशलक्ष पिंपे बाजारात येणार
Global Updates

Global Updates

esakal

Updated on

वॉशिंग्टनः आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या वाढलेल्या किमतींना ब्रेक लावण्यासाठी अमेरिकेने इराणी कच्च्या तेलाच्या विक्रीवर घातलेले निर्बंध तात्पुरते मागे घेण्याची घोषणा शनिवारी केली. सध्या समुद्रात अडकून पडलेल्या इराणमधील कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग यामुळे मोकळा झाल्याचे मानले जाते.

भारतीय कंपन्यांनी हे तेल खरेदी करण्यासाठी तयारी केल्याचे समजते. दुसरीकडे केंद्र सरकारने राज्यांना व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘एलपीजी’च्या पुरवठ्यांत वीस टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठप्प झालेल्या अर्थकारणाला आणखी गती मिळू शकते.

Global Updates
Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसीत खंडणीसाठी दहशत; महिला व्यावसायिकेला धमकी, चालक व सुपरवायझरला मारहाण

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट म्हणाले की, ‘‘अमेरिकेकडून देण्यात आलेल्या ताज्या सवलतींमुळे १४० दशलक्ष पिंपे एवढे कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये येऊ शकेल. इराणी बंदरावरून निघालेल्या पण सध्या समुद्रात असलेल्या तेलवाहू जहाजांसाठीच ही सवलत लागू असेल. नव्याने उत्पादन किंवा खरेदीला मान्यता देण्यात आलेली नाही.’’

Global Updates
Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?

इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी ब्रेंट क्रूडची किंमत ही ७० डॉलर प्रतिपिंप एवढी होती. आता युद्धानंतर हाच दर प्रतिपिंप ११९.५० डॉलरवर पोचला आहे. दरम्यान इस्राईलने इराणविरोधातील हल्ले येत्या आठवड्यांमध्ये आणखी तीव्र करण्याची धमकी दिल्याने जागतिक अनिश्चिततेमध्ये भर पडली आहे. आता रशियाने देखील इराणसोबतचे मैत्रीबंध कायम असल्याचे जाहीर केल्यानंतर या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com