US Election: मी या पदावरील पहिली महिला असू शकते, अखेरची नाही-कमला हॅरिस

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

तुम्ही कोणाला मतदान केले याचा काहीच फरक पडत नाही. काम आता सुरु होईल. निश्चितच पुढील मार्ग सोपा नसणार

वॉशिंग्टन-  मी या कार्यालयात पहिली महिला असू शकते. पण अखेरची नाही. अमेरिकेने एक संदेश दिला आहे की हा एक शक्यतांचा देश आहे. अमेरिका तयार आहे आणि मी देखील तयार आहे, असे वक्तव्य अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी केले आहे. विजयानंतरच्या पहिल्या भाषणात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तुम्ही आशा, शालीनता, विज्ञान आणि सत्य निवडले. तुम्ही जो बायडन यांना निवडलं, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले. 

त्या पुढे म्हणाल्या की, तुम्ही कोणाला मतदान केले याचा काहीच फरक पडत नाही. काम आता सुरु होईल. निश्चितच पुढील मार्ग सोपा नसणार आहे. पण अमेरिका तयार आहे आणि त्यामुळे मीही पूर्णपणे तयार आहे. 

कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला उपराष्ट्राध्यक्ष आहेत. कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला हॅरिस या दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या महिला अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षही असतील. 

हेही वाचा- US President Election: मीच जिंकलो ! डोनाल्ड ट्रम्प यांना अजूनही पराभव अमान्य

भारतीय आई आणि जमैकन वडील असलेल्या कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. त्यांचा जन्म 1964 मध्ये श्यामला गोपालन हॅरिस आणि वडील डोनाल्ड हॅरिस यांच्या घरी झाला होता. घटस्फोटानंतर आई श्यामला गोपालन यांनी कमला यांचा सांभाळ केला. हॅरिस यांनी ब्राऊन विद्यापीठामधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठामधून कायद्याची पदवी घेतली. 
हेही वाचा- अमेरिकेच्या जनतेनं दुसऱ्यांदा नाकारलेले ट्रम्प पाचवे राष्ट्राध्यक्ष; 1992 नंतरचे पहिलेच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Election 2020 Kamla Harris victory speech