US Election: कमला हॅरिस यांच्या नावाचा चुकीचा उच्चार भोवला

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 October 2020

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जॉर्जिया प्रांतातील एका प्रचारसभेत सिनेटर डेव्हीड पर्ड्यू यांनी हॅरिस यांच्या नावाचा मुद्दाम चुकीचा उल्लेख केल्याची टीका होत आहे.

वॉशिंग्टन-  रिपब्लिक पक्षाच्या नेत्याने प्रचारसभेत उपाध्यक्ष पदासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या नावाचा चुकीचा उच्चार केल्यानंतर हॅरिस यांच्या समर्थकांनी ऑनलाइन मोहिम चालवत विरोधकांवर टीका केली.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जॉर्जिया प्रांतातील एका प्रचारसभेत सिनेटर डेव्हीड पर्ड्यू यांनी हॅरिस यांच्या नावाचा मुद्दाम चुकीचा उल्लेख केल्याची टीका होत आहे. ‘काह-माह-ला? कामला-माला-माला? मला माहित नाही, काहीही असो’ असे ते हजारोंच्या प्रचारसभेत म्हणाले. यानंतर हॅरिस यांच्या समर्थकांनी ‘माय नेम इज’ आणि ‘आय स्टँड विथ कमला’ या हॅशटॅगने ऑनलाइन मोहिम सुरु केली. पर्ड्यू यांच्यावर टीका करतानाच अनेक भारतीयांनी आपल्या हिंदू नावाचा उल्लेख करत त्याचा अर्थही सांगितला. चहूबाजूंनी टीका झाल्यावर पर्ड्यू यांच्या प्रवक्त्याने सारवासारव करत ‘नावाचा केवळ चुकीचा उच्चार झाला, इतर कोणताही उद्देश नव्हता’ असे स्पष्ट केले. मात्र, पर्ड्यू यांच्या या उच्चारामुळे रिपब्लिकन पक्षाविरोधात जनमत गेले असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Bihar Election : भल्याभल्यांना टक्कर देणारी पुष्पमप्रिया; मुख्यमंत्री पदासाठी...

बिडेन-हॅरिस यांच्या हिंदूंना शुभेच्छा

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी देशातील हिंदू नागरिकांना नवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. वाईटावर चांगल्याचा पुन्हा एकदा विजय होवो आणि सर्वांना संधी मिळून नवी सुरुवात होऊ दे, अशी इच्छा बायडेन यांनी व्यक्त केली. तर कमला हॅरिस यांनी नवरात्रीनिमित्त जगभरातील हिंदू नागरिकांना शुभेच्छा देताना हा सण समाजाच्या विकासासाठी सर्वांना प्रेरणा देवो, अशी इच्छा व्यक्त केली. अमेरिकेच्या आगामी अध्यक्षीय निवडणूकीत अमेरिकी भारतीयांची मते महत्त्वाची आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election america kamla haris wrong name pronunciation