ट्रम्प-बायडेन यांच्यात डिबेट'युद्ध'; कोणत्या मुद्यांवर होणार वाद? का आहे महत्व?

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 September 2020

3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत.

वॉशिंग्टन- 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमनेसाममे आहेत. ट्रम्प पुन्हा एका राष्ट्रपती होण्याची इच्छा बाळगून आहेत, पण यावेळी त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. दुसरीकडे जो बायडेन यांना अमेरिकी नागरिकांचा पाठिंबा वाढताना दिसत आहे. अशात सर्व जगाचं लक्ष अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे लागलं आहे.

अध्यक्षीय निवडणुकीला 35 दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ऐतिहासिक अशा 'प्रेसिडेंशियल डिबेट'ला सुरुवात होत आहे. ज्यात डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन अनेक मुद्द्यांवरुन आपली मतं व्यक्त करतील आणि ते एकमेकांसोबत वादविवाद करतील. 

कोरोनाच्या संकटात भर; अमेरिकेतील रुग्णालयांवर मोठा सायबर हल्ला

डिबेट कधीपासून सुरु होत आहे?

अध्यक्षीय निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली असून टीव्ही डिबेट याचा एक भाग आहे. यावेळी तीनवेळा राष्ट्रपती स्तरासाठी वाद-विवाद होईल आणि एकवेळा उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारांमध्ये वादविवाद होईल. 

डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडेन

- पहिली डिबेट- 29 सप्टेंबर, क्वीवलँड, ओहियो
- दूसरी डिबेट- 15 ऑक्टोंबर, मियामी, फ्लोरिडा
- तिसरी डिबेट- 22 ऑक्टोंबर, नेशविली, तेनेसी

माईक पेंस विरुद्ध कमला हॅरिस ( उपराष्ट्रपतीपदासाठी डिबेट)

- 7 ऑक्टोंबर, साल्ट लेक सिटी, उटाह

सर्व डिबेट 90 मिनिटांच्या असतील, ज्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर उमेदवार समोरासमोर असतील. अमेरिकी वेळेनुसार या सर्व डिबेट रात्री नऊ वाजता होणार आहेत. भारतीय वेळेनुसार पुढच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता या डिबेट होतील. म्हणजे 29 सप्टेंबरला होणारी डिबेट भारतीय वेळेनुसार 30 सप्टेंबरच्या सकाळी साडेसहा वाजता होईल. सुरुवातीपासूनच अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांसाठी डिबेटचे प्रावधान आहे. 

पहिल्या डिबेटमध्ये असतील महत्वाचे मुद्दे

मंगळवारी होणारी पहिली डिबेट 90 मिनिटे चालेल, यात 6 मुद्द्यांवर वादविवाद होणार आहे. प्रत्येक मुद्द्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. पहिला उमेदवार आपला पक्ष ठेवेल आणि दुसरा उमेदवार त्याला उत्तर देईल. ओहियोमध्ये होणाऱ्या पहिल्या डिबेटमध्ये पुढील सहा मुद्दे असतील. 

-डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांचा रिकॉर्ड
- सुप्रिम कोर्टाचा विषय
-कोरोना महामारीविरोधातील लढाई
-अर्थव्यवस्थेची स्थिती
- अमेरिकेत होणारे दंगे
-निवडणुकीचे महत्व

मी सामान्य माणूस, आईकडून घेतलं 500 कोटींचं कर्ज'; अनिल अंबानींचा खुलासा

अमेरिकी निवडणुकीत डिबेटला महत्व का?

अमेरिकेत निवडणुकीपूर्वी प्रेसिडेंशियल डिबेट एक जूनी परंपरा आहे. 1858 मध्ये अब्राहम लिंकन यांनी अशा सात डिबेटमध्ये भाग घेतल्यानंतरच विजय मिळवला होता. असं मानलं जातं की, उमेदवार प्रचारात ज्या लोकांपर्यंत थेट पोहोचू शकले नाहीत, यामाध्यमातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. शिवाय ज्या लोकांनी अजून आपला उमेदवार ठरवला नाही, ते डिबेटनंतर आपला उमेदवार निश्चित करतात. 

अध्यक्षपदाचे उमेदवार काय बोलतात, कसे दिसतात, स्क्रीनवर किती सक्रिय आहेत आणि काय विचार करतात या सर्व गोष्टी डिबेटवेळी महत्वाच्या ठरतात. 1960 च्या निवडणुकीत जॉन एफ. कॅनेडी आणि रिचर्ड निक्सन यांच्यात डिबेट झाला. यावेळी निक्सन डिबेटमध्ये प्रभाव पाडू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या रेटिंग्जमध्ये कमी आली होती. त्यानंतर त्याचा निवडणुकीत पराभव झाला होता. 

(edited by- kartik pujari) 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election donald trump and joe biden presidential debate