ट्रम्प यांची मोठी घोषणा! कोरोनावरील उपचार सर्वांना मिळणार मोफत

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 October 2020

अमेरिकेच्या अध्यक्षपदी फेरनिवडीसाठी प्रयत्नशील असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी विस्कॉन्सीनमधील सभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली.

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या अध्यक्षपदी फेरनिवडीसाठी प्रयत्नशील असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी विस्कॉन्सीनमधील सभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. कोरोनावरील प्रतिपींड (ए‌ँटिबॉडी) उपचार सर्वांना मोफत मिळतील असे त्यांनी जाहीर केले.

जेन्सव्हील येथील सभेत ट्रम्प यांनी डेमोक्रॅटीक पक्षाचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांच्यावर टीकाही केली. कोरोना चाचणी पॉझॉटिव्ह आल्यानंतर ट्रम्प यांना चौथ्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला होता. ते म्हणाले की, ‘बरे होण्याची माझी पद्धत सुपर अशी आहे. त्याचवेळी बायडेन हे निराशावादी आहेत. तीन नोव्हेंबरच्या निवडणूकीत तुम्हाला यात निवड करावी लागेल. त्याआधी त्यांनी मिशिगन येथील मस्कीगन येथील सभेत इशाराच दिला. ते म्हणाले की, ‘नोव्हेंबरमधील निवडणूकीत डेमोक्रॅटीक पक्षाचा विजय झाला तर कोरोना संसर्गाची तसेच एकूणच अमेरिकेतील स्थिती आणखी खराब होईल. मिशिगनच्या गव्हर्नरने या घडीला शास्त्रीय पद्धतीचा अभाव असलेले कठोर लॉकडाऊन केले आहे. तसेच होऊन आर्थिक घडी सावरण्याची प्रक्रिया विस्कळीत होईल. बायडेन देश बंद करतील. लस आणण्यास उशीर करतील आणि जागतिक साथ दीर्घ काळासाठी वाढवतील.

US Election: कमला हॅरिस यांच्या नावाचा चुकीचा उच्चार भोवला

शाळांबाबत सूचक वक्तव्य

कोरोनावरील उपचारानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर ट्रम्प यांनी प्रचारासाठी झोकून घेतले आहे. त्यांचा 14 वर्षांचा मुलगा बॅरन यालाही कोरोना संसर्ग झाला होता. त्याविषयी ट्रम्प विस्कॉन्सीनमधील सभेत म्हणाले की, बॅरन तरुण असल्यामुळे त्याची प्रतिकाशक्ती चांगली आहे. त्यामुळे इतर अनेक तरुण अमेरिकी नागरिकांप्रमाणे तो विषाणूवर सहज मात करू शकला. शाळा सुरू करण्यासाठी हे सूचक वक्तव्य मानले जात आहे.

प्रतिपींड ही सर्वोत्तम गोष्ट आहे. मला जे मिळाले ते प्रत्येकाला मोफत उपलब्ध करून दिले जाईल, असं ट्रम्प म्हणाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election Donald trump said everyone will get free corona aid